मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Shiv Sena vs BJP: मुंबईत शिवसेना - भाजप कार्यकर्ते भिडल्याचा LIVE VIDEO, पोलिसांचा लाठीमार

Shiv Sena vs BJP: मुंबईत शिवसेना - भाजप कार्यकर्ते भिडल्याचा LIVE VIDEO, पोलिसांचा लाठीमार

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

    मुंबई, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील जुहू परिसरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सकाळपासूनच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रते इतके आक्रमक होते की जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. VIDEO: नारायण राणेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप कार्यालयावर दगडफेक

    #WATCH | Maharashtra: A clash breaks out amid Shiv Sena workers, BJP workers and Police in Mumbai as Shiv Sena workers marched towards Union Minister Narayan Rane's residence.

    Union Minister Narayan Rane had given a statement against CM Uddhav Thackeray yesterday. pic.twitter.com/TezjDGGqAb — ANI (@ANI) August 24, 2021 नितेश राणेंनी दिलं होतं आव्हान नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "असं ऐकलं की युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे अन्यथा यापुडे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही. सिंहाच्या हद्दीत शिरण्याचे धाडस करु नका. आम्ही तुमची वाट पाहतोय". नितेश राणे यांनी रात्रीच्या सुमारास हे ट्विट केलं आहे. मी काय नॉर्मल माणूस आहे का? या संपूर्ण प्रकरणावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माहितीच्या आधारे मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहिती नाहीये. गुन्हा नसताना वॉरंट निघालं, अटक होणार चालू आहे. मी काय नॉर्मल माणूस वाटलो का तुम्हाला. नाशिक पोलिसांची इतकी तत्परता ही आदेशामुळे आहे. आमचं पण सरकार वर आहे ना? पाहूयात ना हे कुठपर्यंत उडी मारतात असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Mumbai, Shiv sena

    पुढील बातम्या