मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

“मी समर्थन करत नाही'', नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“मी समर्थन करत नाही'', नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे,24 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनी राडा सुरु केला आहे. याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी राणेंच्या वाक्याचे समर्थन करत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रत्येकाची वेगळी शैली असते. नारायण राणेंचीही आहे. मी त्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यांच्या बोलण्याची स्टाईल आहे. पण त्यासाठी थेट अटक? अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? ,असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणालेत.

एखाद्या वक्तव्यावरुन लगेच त्यांना अटक करणे योग्य ठरणार नाही. सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती अस म्हणत थेट अटक करणं योग्य नाही. राज्य सरकारकडे केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचे अधिकार नाहीत, असंही ते म्हणालेत.

''नारायण राणेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करुन शॉक दिला पाहिजे''

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सर्व अधिकारांची पायमल्ली सुरु आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या एका विधानाबद्दल थेट अटक वॉरंट निघणे हा राज्य सरकारने केलेल्या सत्तेचा दुरुपयोग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री मोदींना चोर म्हणाले होते

प्रत्येकाची बोलण्याची एक शैली असते, त्याप्रमाणे प्रत्येकजण बोलत असतो. जसे नारायणराव बोलले आहेत, तसेच दसरा मेळाव्यात उद्धवजी देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदीजी यांना चोर म्हणाले होते. विधानसभा उपसभापती कोणत्याही पक्षाचा नसतो तेव्हा निलमताई कुठल्या अधिकाराने बोलत आहेत?, असं भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणालेत.

जनआशीर्वाद यात्रा रद्द होणार नाही

नारायण राणे साहेबांच्या एका वाक्यावरून टोक गाठून त्यांना अटक होईल इतका देशाचा कायदा कमकुवत नाही. राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकणात भाजपाचा जनाधार वाढत आहे, या राजकीय भीतीपोटी हे सगळे सुरु आहे. परंतु यामुळे जनआशीर्वाद यात्रा रद्द होणार नाही, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Narayan rane, Shivsena