मुंबई, 22 जुलै : विरोधी पक्षांच्या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांनी हजर राहू नये, असा जीआर काढल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध भाजप असा वाद पेटला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसंच, देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले सचिन तेंडुलकर आहे, अशी स्तुतीसुमनं ही उधळली.
राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधकांना भेटू न देण्याच्या निर्णयावरून सरकार विरुद्ध विरोधकांमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'हा निर्णय फडणवीस सरकारचा काळातला होता, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
'आम्ही कायबी करीन, आमचं दूध हाय' शेतकऱ्याच्या लेकाने केली दुधाने अंघोळ, VIDEO
'हा मूळ निर्णय 2020 सालचा असून फडणवीस सरकारचा नाही. फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विरोधकांवर भेटताच येणार नाही, असं कधीही म्हटलं नव्हतं. विरोधकांना अधिकाऱ्यांनी भेटू नये हा तुघलकी निर्णय आहे', अशी टीका दरेकरांनी केली.
हा निर्णय विरोधकांवर अन्याय करणारा आहे. कोरोना काळात सरकारच्या निष्क्रीयतेमुळे सरकारची नाचक्की झाली आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण सरकारने कितीही मनाई करु देत आम्ही आमचे दौरे करणारच, असंही दरेकरांनी ठामपणे सांगितले.
कोरोना नाही म्हणून मारला बोकड पार्टीवर ताव, आता चुपचाप झाले गाव!
त्याचबरोबर, 'प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीस हे एक उत्तम अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. राज्याच्या राजकारणातले ते सचिन तेंडुलकर आहे', अशी स्तुतीसुमनं दरेकरांनी उधळली.
तो जीआर फडणवीस सरकारच्याच काळातला -थोरात
विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकारी उपस्थितीत राहू नये हा जीआर जुनाच आहे, आधीच्या सरकारच्या काळातील निर्णय आहे, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले आहे.
सोन्याचांदीच्या दरांनी गाठला उच्चांक! चांदी पहिल्यांदा 61 हजारांच्या वर
'राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. या परिस्थितीशी सरकार सामना करत आहे. अशा वेळी अधिकाऱ्यांना कोरोना काळात काम करण्यास वेळ मिळाला पाहिजे असे आमचे ठाम मत आहे,' असंही थोरातांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP