Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाही? अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खुलासा

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाही? अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खुलासा

'ते कोणतीही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी दाखवून दिले की, पदापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्वाचे...'

'ते कोणतीही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी दाखवून दिले की, पदापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्वाचे...'

'ते कोणतीही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी दाखवून दिले की, पदापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्वाचे...'

    मुंबई, 06 जुलै :  राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाची माळ ही एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा मान देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना न मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पण, देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, हे मला माहिती होतं. उलट त्यांनी पदापेक्षा महाराष्ट्राचं हितं पाहिलं, त्यांचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार अशी दाट शक्यता होती आणि तशी चर्चाही रंगली होती. पण, अचानक फडणवीस यांनीच पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. पण, अमृता फडणवीस यांनीही हे सर्व फेटाळून लावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नाही हे मलाआधीची माहित होतं. ते कोणतीही पद स्वीकारणार नव्हते. त्यांच्या या निर्णयाचा मला खूप गर्व वाटतो. त्यांनी दाखवून दिले की, पदापेक्षा महाराष्ट्राचे हित महत्वाचे आणि मोठे आहे. त्यांनी मोठ्या मनाने, हसतमुखाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं. याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. (पेण, पनवेल, उरण तालुक्यात रात्रभर मुसळधार; भातशेती पाण्याखाली जाण्याची भीती) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री सगळे आमदार झोपल्यानंतर फडणवीस यांची भेट घेत होतो, अशी कबुली दिली होती. त्यांच्या वक्तव्याला अमृता फडणवीस यांनीही दुजोरा दिला आहे. 'देवेंद्र फडणवीस हे रात्री वेश बदलून शिंदे यांना भेटायला जात होते. हुडी आणि गॉगल घालून ते भेटायला जात होते. त्यांचा हा वेशांतर पाहून मीही त्यांना ओळखत नव्हते, असा खुलासाच अमृता फडणवीस यांनी केला. (अभ्यास केला नाही म्हणून पालकांनी केली बेदम मारहाण, 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू) देवेंद्र फडणवीस हे नेहमी कामाला महत्त्व देत असतात, पदाच्या पलिकडे जाऊन त्यांनी जनतेचं हिताचं काम करत आहे. त्यांना महाराष्ट्राची सेवा करायला आवते. याआधीही ते आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री असताना लोकांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. आताही ते सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहे. एकनाथ शिंदे हे 24 तास काम करत असतात. त्यामुळे दोघेही महाराष्ट्राच्या हिताचे काम करतील, असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या