मुंबई, 6 जुलै : मुलांनी चांगला अभ्यास करावा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. आपल्या पाल्यानं अभ्यासाला बसावं, त्यांना अभ्यासाची गोडी वाढावी म्हणून पालक त्यांना प्रसंगी शिक्षा देखील करतात. या शिक्षेतूनच एका 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या चिमुकलीचा आई-वडिलांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी मुलीचा मृतदेह 40 किलोमीटर लांब रेल्वे स्टेशनच्या जवळ झाडांमध्ये फेकला होता. पण, पोलिसांच्या तपासामध्ये या सर्व घटनेचा गौप्यस्फोट झाला आहे.
झारखंड (Jharkhand) मधील बारीगोडामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घितिका महतो असं या मृत मुलीचं नाव आहे. 'घितिकानं अभ्यास केला नव्हता. त्यामुळे तिला बांधून मारहाण केली त्यामध्येच तिचा मृत्यू झाला' अशी कबुली घितिकाच्या वडिलांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री बारीगोडामधील उत्तम महतो आणि त्यांची पत्नी अंजना महोतो यांनी मुलीला दोरीला बांधून मारहाण केली. त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. हे पती-पत्नी 29 जूनपासून त्यांच्या घरी परतले नव्हते. त्यानंतर 4 जुलै रोजी ते मुलीशिवाय घरी पतले. शेजाऱ्यांनी मुलीची विचारपूस केली असता 'आपल्या मुलीची तब्येत खराब झाली होती. त्यामुळे आपण तिला झाग्राममध्ये उपचारासाठी नेत होते. उपचारासाठी नेत असतानाच तिचा वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही तिच्या मृतदेहाचे दफन केले आहे,' अशी सारवासारव तिच्या आईनं केली.
नाशिक जिल्ह्यात मुस्लिम धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या
या मुलीला आई-वडिलांनी मारहाण केल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी पालकांची चौकशी केल्यानंतर संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. घितिकानं अभ्यास केला नव्हता. त्यामुळे तिचे हात-पाय दोरीनं बांधून एक तास तिला मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.' अशी कबुली त्यांनी दिला. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jharkhand, Murder