दरम्यान, हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 3 ते 4 दिवस राज्यात सर्वत्र पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड, माणगाव, पनवेल , पेण , मुरुड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.पनवेल आणि उरण तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. #Rain #RainUpdate pic.twitter.com/jRVEuCUvn3
— News18Lokmat (@News18lokmat) July 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raigad news, Rain