ठाणे, 14 सप्टेंबर: ठाण्यातील (Thane) कालशेत भागात एक हृदय हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील काही मजुरांनी आपल्या मालकाची निर्घृण हत्या (worker killed Contractor) केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक (2 arrested) केली आहे. अन्य साथीदार मजुरांचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी पैशांसाठी मालकाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या घटनेचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत आहेत. हनुमंत शेळके असं हत्या झालेल्या मालकाचं नाव असून ते कोलशेत भागातील वरचा गाव परिसरात वास्तव्याला होता. मृत शेळके हे कोलशेत भागात रंगकामाचं कंत्राट घेत असत. हे काम करण्यासाठी त्यांच्याकडे काही मजूर देखील होती. याच मजुरांनी त्यांच्या कट रचून काटा काढला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवा वर्मा (वय-24) आणि सुरज वर्मा (वय-22) अशा दोघा मजुरांना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. हेही वाचा- ‘पैशांच्या बदल्यात महिलेची मागणी’; बीडच्या रस्त्यावर सुरू होताना संतापजनक प्रकार नेमकं काय घडलं? 1 सप्टेंबर रोजी रात्री मृत शेळके यांना एक फोन कॉल आला होता. फोनवरील व्यक्तीनं शेळके यांचा एक मजूर आजारी असल्याची माहिती दिली. तसेच मजुराच्या उपचारासाठी काही पैशांची आवश्यकता असल्याचं सांगितलं. फोन आल्यानंतर रात्री साढेआठच्या सुमारास मृत शेळके हे आपल्या आजारी मजुराला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडले. पण दुसऱ्या दिवशीही ते परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शेळके बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. हेही वाचा- …म्हणून पोलीस पती करायचा पत्नीचा छळ; गरोदर विवाहितेनं गौरी आगमनाच्या दिवशीच मृत्यूला कवटाळलं दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी मृत शेळके यांचा व्यावसायिक भागीदार असणाऱ्या व्यक्तीला एका अज्ञातानं फोन केला. तसेच हनुमंत यांची सुटका करायची असेल तर 15 लाख रुपये दे, अशी मागणी केली. खंडणीची मागणी झाल्यानंतर संबंधित भागीदारानं त्वरित या घटनेची माहिती कापूरबावडी पोलिसांना दिली. पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास केला असता, मजुरांनीच हनुमंत शेळके यांची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.