मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'पैशांच्या बदल्यात महिलेची मागणी'; बीडच्या रस्त्यावर सुरू होताना संतापजनक प्रकार

'पैशांच्या बदल्यात महिलेची मागणी'; बीडच्या रस्त्यावर सुरू होताना संतापजनक प्रकार

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Crime in Beed: बीड शहरातील मित्रनगर येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीनं महिलेचा भररस्त्यात छळ केला आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 13 सप्टेंबर: बीड (Beed) शहरातील मित्रनगर येथे एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्यानं उसणे घेतलेल्या पैशांसाठी सावकारानं महिलेचा छळ (Sexual molestation) केला आहे. नवऱ्यानं घेतलेले पैसे परत दे, नाहीतर माझ्यासोबत चल, असं म्हणत आरोपीनं फिर्यादी महिलेची भररस्त्यात छेड काढली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार केली असताना, पोलिसांनी किरकोळ कारवाई करून आरोपीला मोकाट सोडलं आहे. पण आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही, तर जीवन संपवण्याचा इशारा पीडित महिलेनं दिला आहे.

संबंधित 38 वर्षीय पीडित महिला बीड शहरातील मित्रनगर परिसरातील रहिवासी असून त्या गाड्यावर भाजीपाला विकण्याचं काम करत आहे. काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या पतीनं आरोपीकडून काही पैसे उसणे घेतले होते. पण या पैशांसाठी आरोपीनं गुंडाच्या मदतीनं फिर्यादीचा आणि तिच्या पतीचा छळ केला आहे. आरोपीनं 22 जून रोजी पीडित महिलेच्या भाजी विकण्याच्या गाड्याजवळ येऊन दडपशाही करत तिच्याशी अश्लील वर्तन केलं होतं. या प्रकरणी पीडित महिलेनं बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी सीताराम प्रभू बडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा-नाशिक हादरलं! दुचाकी अडवून महिलेला कारमध्ये टाकलं,बलात्कार करत काढले अश्लील फोटो

पण पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करत किरकोळ कारवाई केली होती. यानंतर 11 सप्टेंबर रोजी आरोपीनं महिलेच्या गाड्यावर येऊन पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन करत मारहाण केली आहे. दरम्यान दुसऱ्यावेळी घटनास्थळी फिर्यादीचा पती असल्यानं त्यानं आरोपीच्या तावडीतून फिर्यादीची सुटका केली आहे. याप्रकरणी पीडितेनं पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पण पोलिसांनी पुन्बा अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

हेही वाचा-निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण;खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं

पण आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला जेरबंद करावं, असा पवित्रा फिर्यादी महिलेनं घेतली आहे. आरोपीवर योग्य ती कारवाई न झाल्यास 20 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा फिर्यादी महिलेनं दिला आहे. 'कोणत्याही पोलीस ठाण्यात जा, माझं कोणीही काहीही करू शकत नाही. त्यामुळे तू कुठेही जा तुला आणि तुझ्या पतीला सोडणार नाही, अशी धमकीही आरोपी सीताराम बडे यांनी दिल्याचं फिर्यादीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या, अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्या, अशी मागणी फिर्यादीनं पोलिसांकडे केली आहे.

First published:

Tags: Beed, Crime news