जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...म्हणून पोलीस पती करायचा पत्नीचा छळ; गरोदर विवाहितेनं गौरी आगमनाच्या दिवशीच मृत्यूला कवटाळलं

...म्हणून पोलीस पती करायचा पत्नीचा छळ; गरोदर विवाहितेनं गौरी आगमनाच्या दिवशीच मृत्यूला कवटाळलं

Shocking! रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ

Shocking! रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तरुणीवर बलात्कार, घटनेने खळबळ

Suicide in Beed: ऐन गौरी आगमनाच्या (Gauri Arrival) दिवशी एका महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 14 सप्टेंबर: ऐन गौरी आगमनाच्या (Gauri Arrival) दिवशी एका महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलीस पतीकडून सातत्यानं होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला (Mental and physical abuse By police husband) कंटाळून पीडितेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे पीडित महिला सात महिन्यांची गरोदर (7 month pregnant woman suicide) होती. अशात पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ऐन गौरी आगमनाच्या दिवशी पीडितेनं आत्महत्या केल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ज्योती गोविंद जाधवर असं आत्महत्या करणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. ज्योती या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उकडगाव येथील रहिवासी आहेत. बार्शी तालुक्यातील दरडवाडी येथील माहेर असलेल्या ज्योती याचं 2018 साली उकडगाव येथील गोविंद जावधर याच्याशी विवाह झाला होता. पती गोविंद जाधवर हा उस्मनाबादच्या पोलीस दलात नोकरीला आहे. हेही वाचा- मुलाच्या नोकरीसाठी पतीची फिल्मी स्टाइलने हत्या; महिलेनं BFच्या मदतीनं घडवला थरार लग्नानंतर एक वर्ष दोघांत सर्वकाही चांगलं सुरू होतं. दरम्यान त्यांना एक मुलगाही झाला. तसेच सध्या ज्योती सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. पण हुंड्यातील राहिलेले आठ लाख रुपयांची रक्कम मिळत नसल्यानं पती आणि सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. पती गोविंद जाधवर, सासरा वचिष्ट उत्तम जाधवर, सासू लताबाई वचिष्ट जाधवर यांनी पीडितेकडे हुंड्यासाठी तगादा (Mental and physical abuse for dowry money) लावला होता. हेही वाचा- ‘पैशांच्या बदल्यात महिलेची मागणी’; बीडच्या रस्त्यावर सुरू होताना संतापजनक प्रकार आरोपी सर्वजण पीडित विवाहितेचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं ऐन गौरी आगमनाच्या दिवशी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सात महिन्यांच्या गरोदर महिलेनं अशाप्रकारे जीवन संपवल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात