• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा; 16 वर्षाच्या भाचीला विकणाऱ्या बारबालाला अटक

एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा; 16 वर्षाच्या भाचीला विकणाऱ्या बारबालाला अटक

Crime in Vasai: आरोपी महिलेनं एका रात्रीसाठी (For a night) आपल्या 16 वर्षीय भाचीचा (Niece) साडे चार लाख रुपयांना सौदा (deal for 4.5 lakhs)केला होता.

 • Share this:
  वसई, 24 जून: मीरा रोड याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेनं आपल्या 16 वर्षांच्या सख्ख्या भाचीचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं एका रात्रीसाठी (For a night) आपल्या भाचीचा (Niece) साडे चार लाख रुपयांना सौदा (deal for 4.5 lakhs) केला होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सौदा फसला आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला रंगेहाथ अटक (Accused woman arrest) केली आहे. दरम्यान पोलिसांनी 16 वर्षीय पीडित मुलीची सुखरुप सुटका केली असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. मीरा रोड (Meera Road) येथील रहिवासी असणारी 37 वर्षीय महिला एका 16 वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायासाठी (Minor girl in Prostitution) घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती बेकायदेशीर मानवी तस्करी शाखेला मिळाली होती. एका रात्रीसाठी पीडित मुलीचा साडे चार लाख रुपयांना सौदा केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत एका स्वयंसेवी महिलेच्या मदतीनं आरोपी महिलेशी संपर्क साधला. तसेच पोलिसांनी बनावट ग्राहकही तयार केले. हेही वाचा-चार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी घडलं असं काही... मुंबई-अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये हा व्यवहार ठरला. यानंतर आरोपी महिला अल्पवयीन मुलीला ठरलेल्या ठिकाणी घेऊन आली. पण याठिकाणी आधीपासून सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी आरोपी महिलेला रंगेहाथ अटक केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी पीडित मुलीची सुटका देखील केली आहे. हेही वाचा-ऑनलाईन मैत्रीत आला दुरावा; कधी हॉटेल पार्सल तर कधी मसाजर घरी पाठवून तरुणीचा छळ आरोपी महिला पूर्वाश्रमीची बारबाला असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी आरोपी महिलेची सख्खी भाची असल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: