मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवस बेपत्ता होते प्रेमीयुगल; पाचव्या दिवशी अल्पवयीन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

Jalna minor boy attempt suicide: अल्पवयीन प्रेमीयुगल चार दिवस घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधले.

Jalna minor boy attempt suicide: अल्पवयीन प्रेमीयुगल चार दिवस घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधले.

Jalna minor boy attempt suicide: अल्पवयीन प्रेमीयुगल चार दिवस घरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधले.

जालना, 23 जून: जालना जिल्ह्यातील बदनापूर (Badnapur, Jalna) येथील अल्पवयीन प्रेमीयुगल चार दिवसांपासून बेपत्ता होते. याची तक्रार मुलीच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोन्ही मुलगा आणि मुलीला शोधून काढले आणि बदनापूर येथे आणले. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी असं काही घडलं की, अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न (Minor boy attempt suicide) केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या या मुलगा आणि मुलीला बदनापूर पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावर पकडले. कल्याण येथून बदनापूर पोलिसांनी या प्रेमीयुगलास काल बदनापूर येथे आणले होते. यानंतर मुलीच्या जबाबावरून प्रियकराविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम पोलिसांनी लावले होते.

लव्ह जिहादच्या विरुद्ध प्रकरणं; मुस्लीम तरुणीने हिंदू मुलासोबत केलं लग्न, आता पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

प्रियकर न्यायालयात हजर केले. त्यानंतर अल्पवयीन असल्यामुळे काल रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जालन्यातील शासकीय बालसुधारगृहात दाखल करण्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. यावेळी प्रियकराने लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून शौचालयात टॉयलेट क्लिनर प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयातून औरंगाबादला घाटी रुग्णालयात रात्रीच हलविण्यात आले आहे. दरम्यान, सदर प्रियकर मुलाची प्रकृती सुधारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल कदीम जालना पोलीस ठाण्यात प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: