वसई, 23 जून: वसईतील एका तरुणीला दिल्लीतील एका अज्ञात तरुणासोबत ऑनलाईन मैत्री (Online Friendship) करणं चांगलंच महागात पडलं आहे. पीडित तरुणीनं मैत्री तोडल्यानं आरोपीनं तिला नाहक त्रास (Harassment) दिला आहे. आरोपीनं पीडितेच्या घरी कधी हॉटेल पार्सल (Hotel Parcel) तर कधी टीव्ही रिपेअरवाला (TV Repair) तर कधी मसाज करणाऱ्या व्यक्तीला पाठवून त्रास दिला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पीडितेला सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे.
पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका अज्ञात युवकाशी मैत्री झाली होती. सुरुवातीला दोघांत चांगला संवाद घडत होता. त्यांची मैत्री वाढत चालली होती. पण कालांतराने दोघांत वितुष्ट आल्यानं त्यांचे मैत्रीसंबंध तुटले. पीडित तरुणीनं मैत्री तोडल्यानं आरोपीनं तिची सोशल मीडियावर बदनामी सुरू केली. आरोपी पीडितेच्या मित्र मैत्रिणी आणि आसपासच्या लोकांशी सोशल मीडियावर मैत्री करुन पीडितेची बदनामी करत होता.
यानंतर आरोपीनं पीडितेचा पत्ता देखील शोधून काढला. त्याचबरोबर तिच्या घराच्या पत्त्यावर विविध गोष्टी पाठवून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. आरोपीनं पीडितेच्या घरच्या पत्त्यावर कधी हॉटेल पार्सल, एसी-टीव्ही रिपेअर तर कधी मसाज करणाऱ्या व्यक्तीला पाठवून त्रास द्यायला सुरू केलं. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा- शिक्षकी पेशाला काळीमा! नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिसांनी आरोपी तरुणाला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपी तरुणाला न्यायालयात हजर केलं असता वसई न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत अशाप्रकारे आणखी कोणाला त्रास दिला आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Vasai virar