Home /News /entertainment /

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने शेअर केला पहिला Yoga Video; पॉझिटिव्हिटीसाठी हे करते

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाने शेअर केला पहिला Yoga Video; पॉझिटिव्हिटीसाठी हे करते

राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियापासून (Social Media) दूर असणारी शिल्पा आता अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. तिचा योगा करतानाचा व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

  नवी दिल्ली, 23 ऑगस्ट :  बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी (Bollywood Actress Shilpa Shetty) गेल्या काही काळापासून तणावपूर्ण (Stress) परिस्थितीतून जात आहे. 19 जुलैला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (Raj Kundar) अश्लील व्हिडिओ प्रकरणी अटक झाल्यानंतर तिचं आयुष्य बदललेला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कुंद्राला ताब्यात घेताना त्यासंदर्भात अनेक पुरावे असल्याचं सांगितलेला आहे. तर, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची समोरासमोर चौकशी झालेली आहे. खरंतर गेल्याकाही काळात शिल्पा शेट्टी तिचे योगाचे व्हिडीओ (Yoga Video), फिटनेस आणि रियॅलिटी टीव्ही शोमुळे खूपच चर्चेमध्ये असायची. मात्र, राज कुंद्रा प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून तिला ट्रोलिंगला (Trolling) सामोरं जावं लागलेलं आहे. याशिवाय राज कुंद्राला अटक झाल्यानंतर तिला आपल्या कुटुंबालाही आधार द्यावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शिल्पा शेट्टी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते आहे. (दैव देतं अन् कर्म नेतं; KBC मधील करोडपती कसा झाला दिवाळखोर?) शिल्पा शेट्टीने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. शिल्पा शेट्टी ‘सुपर डांसर 4’ या रियालिटी शोमध्ये जज म्हणून काम पाहते आहे. पण, राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर ती या शोमधून देखील गायब होती. नुकताच या शोमध्ये पुनरागमन केलेला आहे. राजला अटक झाल्यानंतर ती या शोच्या प्रमोशमध्येही सहभागी झाली नाही. आता ती सोशल मीडियावर (Social Media) देखील अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. (महेश मांजरेकरांना Bladder Cancer; ऑपरेशननंतर समोर आली मोठी अपडेट) तिने सोशल मीडियावर योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. शिल्पा पुन्हा एकदा आपलं डेली रुटीन फॉलो करून नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत असल्याचा संदेश आपल्या चाहत्यांना देऊ इच्छित आहे. शिल्पाने या व्हिडिओमध्ये फिकट पोपटी रंगाचा टीशर्ट आणि प्रिंटेड जेगिंज घातली आहे. आत्मविश्वासात आणि उत्साहाने ती योगासनं करते आहे. राज कुंद्रा जेलमध्ये असताना हा पहिला व्हिडिओ शेअर करताना तिने एक मेसेजही लिहिला आहे. (‘चालाखी करणं मला जमत नाही’; सपना चौधरीच्या BOLD फोटोंवर कौतुकाचा वर्षाव) शिल्पा शेट्टीने आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी ती मजबूत असल्याचे सांगितलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सकारात्मकता आणि बॅलन्स हाच चांगला उपाय असतो असं ती म्हणते. सर्वात शांत आणि ऊर्जावान दिनचर्येसाठी वीरभद्रासन, मलासन हे योगासन केल्याने अनेक फायदे होतात. वीरभद्रासन केल्यामुळे आपल्या मांड्या, पोटाचे स्नायू, हाताचे स्नायू, खांदे, पाठ यांचे मसल्स मजबूत होतात.
  यामुळे शरीराचं संतुलन ही वाढतं तर, आपल्या नितंबाना आराम मिळतो. पचन व्यवस्था चांगली होते. अस तिने सांगितलं आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव राहण्याच्या तिच्या संदेशावर अनेकजण कमेंट करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood actress, Lifestyle, Shilpa shetty

  पुढील बातम्या