मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /तालिबानमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी होणारं लग्न मोडणार, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला भीती

तालिबानमुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी होणारं लग्न मोडणार, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीला भीती

अफगाणिस्तानावर (Afghanisthan) तालिबाननं (Taliban) कब्जा केल्यानं तेथील नागरिकांचं आयुष्य बदलून गेलं आहे. आता बिग बॉसमुळे (Big Boss) प्रसिद्धीला आलेल्या अभिनेत्रीलाही तिचं लग्न मोडेल अशी भीती आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट : अफगाणिस्तानावर (Afghanisthan) तालिबाननं (Taliban) कब्जा केल्यानं तेथील नागरिकांचं आयुष्य बदलून गेलं आहे. गेल्या आठवडाभरात हजारो नागरिकांनी मिळेल त्या मार्गानं देश सोडून पलायन केलं आहे. अफगाणिस्तानातील सत्ता बदलाचा फटका तेथील नागरिकांसोबतच भारतीय अभिनेत्रीलाही बसला आहे.

'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री अर्शी खान (Bigg Boss fame Arshi Khan) हिनं आपलं लग्न या सत्तांतरामुळे मोडेल अशी भीती व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी तिचा ऑक्टोबर महिन्यात साखरपुडा होणार होता. मात्र आता बदलेल्या परिस्थितीमध्ये तो होणार नाही, अशी काळजी तिनं व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानच्या कोणत्या क्रिकेटपटूशी साखरपुडा होणार आहे, याचं नाव अर्शीनं यावेळी सांगितलं नाही. पण, वडिलांनी त्याची माझ्यासाठी निवड केली होती असं ती म्हणाली. 'तो क्रिकेटपटू तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. आमच्यामध्ये चांगली मैत्री देखील झाली होती. पण आता कदाचित मला भारतामध्येच मुलगा बघावा लागेल,' असं अर्शी खाननं म्हंटलं आहे.

तालिबानी दहशतीमुळे दहा वर्षं मुलीनं लपवली ओळख, मुलगा बनून केलं काम फत्ते

अफगाणिस्तानशी आहे कनेक्शन

बिग बॉसच्या 14 व्या सिझनमुळे स्टार झालेल्या अर्शीचं अफगाणिस्तानशी फॅमिली कनेक्शन आहे. तिचे कुटुंबीय हे मुळचे अफगाणिस्तानातील आहेत. अर्शी चार वर्षांची असताना तिचे आजोबा अफगाणिस्तानातून भारतामध्ये आले होते. ते भोपाळमध्ये जेलर होते. पण, मी आणि माझे आई-वडिल हे भारतीय आहोत असं अर्शीनं सांगितलं

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Arshi khan, Taliban