Home /News /mumbai /

Cyclone Nisarg VIDEO : पहिल्याच तडाख्यात मलबार हिलच्या उंच इमारतीची झाली अशी अवस्था

Cyclone Nisarg VIDEO : पहिल्याच तडाख्यात मलबार हिलच्या उंच इमारतीची झाली अशी अवस्था

निसर्ग वादळाचा प्रत्यक्ष तडाखा बसण्याआधीच पहिल्या वाऱ्यातच उच्चभ्रू मलबार हिल परिसरातल्या इमारतीवरचं तात्पुरतं छत असं उडून गेलं. पाहा VIDEO

    मुंबई, 3 जून : निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarg) रायगड जिल्ह्यात जमिनीवर धडकलं आहे. आता ते मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने सरकत आहे. वादळ पुढे सरकण्याचा वेग ताशी 20 किमी असल्याने पुढचे किमान 6 तास मुंबई परिसराला धोका असल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे. प्रत्यक्ष वादळाचा तडाखा बसण्याआधीच मुंबईच्या समुद्रालगतच्या परिसरात सोसाट्याचा वारा सुरू झाला आहे. मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीत एका उंच इमारतीची वाऱ्याने काय दशा झाली त्याचा VIDEO VIRAL झाला आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या मलबार हिल परिसरात शासकीय उच्चपदस्थांचे आणि राजकारण्यांचे बंगले, निवासस्थानं आहेत. या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात वादळाचा पहिला तडाखा जाणवला. एका उंच इमारतीच्या छतावर तात्पुरती उभारलेली शेड वाऱ्याने पुरती उडवून दिली. मुंबई आणि ठाणे परिसरात ताशी 80 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. निसर्ग वादळाचं केंद्रक हळूहळू ठाणे जिह्याकडे सरकत आहे. मुंबईलाही याचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे पुढचे काही तास घराबाहेर पडणं टाळा, असं आवाहन करण्यात आलं आहे. अन्य बातम्या समुद्रातून जमिनीकडे घोंघावणाऱ्या चक्रीवादळाच्या डोळा कॅमेऱ्यात कैद! हजार रुपयांचं औषध दीड लाखाला; अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांचे धक्कादायक अनुभव पुण्यासह जिल्ह्यालाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा; घरे, गाड्यांची अशी झाली अवस्था
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Cyclone

    पुढील बातम्या