Home /News /pune /

पुण्यासह जिल्ह्यालाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा; घरे, गाड्यांची अशी झाली अवस्था

पुण्यासह जिल्ह्यालाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा; घरे, गाड्यांची अशी झाली अवस्था

मुंबई, ठाण्यासह पुणे शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

    पुणे, 3 जून: निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले आहे. ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही तासात चक्रीवादळ मुंबईत येणार असून ठाणे, पालघर जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यासह पुणे शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हेही वाचा.. Nisarga Cyclone: रत्नागिरीच्या मिर्य बीचवर उसळल्या मोठ्या लाटा, पाहा VIDEO चिंचवडमधील विवेक वसाहत केशवनगर येथे वादळामुळे इनोव्हा गाडीवर भले मोठे झाड कोसळल्यामुळे मोठे नुकसान झालं आहे. शहरात 20 पेक्षा अधिक झाड उन्मळून पडली आहे. अनेक घरावरीव पत्रे उडाली आहेत.  पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. बुधवारी सकाळपासून वाऱ्याचा वेग वाढला असून शहरातील आणि उद्यानातील 20 पेक्षा झाडं उन्मळून पडली आहेत. यामुळे अनेक वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. थेरगाव आणि इतर भागातही नुकसान झालं आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नाल्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीमधील अनेक घरात पाणी शिरलं आहे. सुदैवाने आतापर्यंत कुठेही जीविहितहानी झालेली नाही. पिंपरी शहरात सोसाट्याचा वारा सुरू असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, WhatsApp वर आलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. चक्रीवादळाबाबत वेळोवेळी सरकारी यंत्रणांकडून माहिती दिली जाईल. अधिकृत न्यूज चॅनेल किंवा वेबससाइटच्या बातमीवरच विश्वास ठेवा. 'निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे राहावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. मंगळवारपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ 90 ते 120 च्या वेगाने घोंघावत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यांना तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि होणार आहे. अशावेळी प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. हेही वाचा....मुंबई, ठाणे, नाशिकसाठी पुढचे 4 तास महत्त्वाचे! या गोष्टी केल्यात का? वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या