मुंबई, ठाणे, नाशिकसाठी पुढचे 4 तास महत्त्वाचे! या गोष्टी केल्यात का?

आता पुढचे तीन ते चार तास लँडफॉलची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी पुढचे काही तास सावध राहणं आवश्यक आहे.

आता पुढचे तीन ते चार तास लँडफॉलची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी पुढचे काही तास सावध राहणं आवश्यक आहे.

  • Share this:
    मुंबई, 3 जून : कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या मुंबईवर आता चक्रीवादळाचं नवं संकट आलं आहे. हवामान खात्याच्या 12 वाजताच्या बुलेटिननुसार, चक्रीवादळ किनाऱ्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. आता पुढचे तीन ते चार तास लँडफॉलची प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी पुढचे काही तास सावध राहणं आवश्यक आहे. चक्रीवादळाने अलिबागच्या दक्षिणेला जमिनीवर प्रवेश केला आहे. आता ते मुंबई, ठाणे जिल्ह्यांना तडाखा देत नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेश करेल. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाचं निसर्ग हे नाव बांग्लादेशने प्रस्तावित केलं आहे. हे निसर्ग चक्रीवादळ तीव्र स्वरूपाचं (Severe Cyclone) आहे. ताशी सुमारे  ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मधूनच 120 किमीसुद्धा वाऱ्याचा वेग वाढू शकतो. यात पत्रे, आधार नसलेल्या कुंड्या, जाहिरातींचे बोर्ड याला धोका असू शकतो. झाडांच्या फांद्या पडू शकतात आणि किनाऱ्याजवळच्या कच्च्या घरांना धोका आहे, असं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं आहे. वादळामुळे अतिवृष्टी होण्याचाही धोका आहे. मुंबईत त्यामुळे सखल भागात पाणी साठू शकतं. त्यामुळे गाडीने बाहेर पडण्याची वेळ आलीच तर हातोड्यासारखी वस्तू गाडीत ठेवा. 2005 च्या पुराच्या वेळी गाडीत अडकल्याने काही जणांचा मृत्यू झाला होता. ते टाळण्यासाठी ही सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहून सरकारी यंत्रणेला मदत करणं आवश्यक आहे. यादरम्यान काय करायचं आणि काय करू नये याबाबतची नियमावली देण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी याचे पालन करणे आवश्यक आहे. ...आणि डोळ्यादेखत कोसळली वीज, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO अशा चक्रीवादळच्या परिस्थितीमध्ये काय काळीज घेतली पाहिजे, याची माहिती हवामान विभागानं प्रसिद्ध केली आहे. चक्रीवादळा दरम्यान वाहन चालवणे टाळा किंवा वाहनात बसूही नका. चक्रीवादळादरम्यान वीज जाण्याची शक्यता आहे. त्यात आपात्कालिन परिस्थिती उद्भवली तर नातेवाईकांकडून मदत मागती येऊ शकते. यासाठी आधीच तुमचे फोन, लॅपटॉप, बॅटरी बॅकअप चार्ज करून ठेवा. 1948 ला मुंबईने अनुभवला होता चक्रीवादळाचा विद्ध्वंस! काय घडलं होतं तेव्हा... धोकादायक इमारतींपासून दूर राहा. तुम्ही अशा इमारतीत राहात असाल तर आधीच सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हा. त्यातून पुढे येणारा धोका टाळता येऊ शकतो. चक्रीवादळादरम्यान झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर घराबाहेर पडू नका. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात अशी झाडे असतील तर दूर राहा. WhatsApp वर आलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवू नका. चक्रीवादळाबाबत वेळोवेळी सरकारी यंत्रणांकडून माहिती दिली जाईल. अधिकृत न्यूज चॅनेल किंवा वेबससाइटच्या बातमीवरच विश्वास ठेवा. अन्य बातम्या गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण... देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख पार, तरी ICMRकडून आली दिलासादायक बातमी
    First published: