मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /रोगापेक्षा इलाज भंयकर, मुंबईत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी आणि निराशा!

रोगापेक्षा इलाज भंयकर, मुंबईत लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी आणि निराशा!

मुंबईच्या अनेक केंद्रांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांना माघारी परतावे लागले होते.

मुंबईच्या अनेक केंद्रांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांना माघारी परतावे लागले होते.

मुंबईच्या अनेक केंद्रांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांना माघारी परतावे लागले होते.

मुंबई, 29 एप्रिल : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लसीकरणावर (corona vaccine) भर दिला जात आहे. 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, मुंबईत (Mumbai) लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. अनेक केंद्रा-केंद्रावर नागरिकांची भांडण होताना बघायला मिळत आहे. 12 वाजेपासून लसीकरण सुरू होणार असले तरी नागरिकांनी मात्र सकाळपासूनच रांगा लावलेल्या आहेत.

मुंबईच्या गोरेगाव परिसरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांमध्ये भांडणाचे मोठे प्रकार दिसून येत आहे. याखेरीज 4200 लशीचे डोस उपलब्ध झाले असून कोवॅक्सिनचे केवळ 1000 डोस आहेत. असं असताना नागरिक मात्र हजारोच्या संख्येने आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त लोकं आल्याने एकच गोंधळ उडालेला आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांना सांभाळता सांभाळता त्रेधातिरपट उडत आहे.

पेपर विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअर झाला,घरून काम करत असताना कोरोनाची लागण झाली अन्

बुधवारी सुद्धा मुंबईच्या अनेक केंद्रांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्यामुळे हजारो लोकांना माघारी परतावे लागले होते. बुधवारी रात्री मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर आज आपल्याला लसीकरण करता येईल या उद्देशाने नागरिक वेगवेगळ्या केंद्रांवर गेले होते. खाजगी केंद्रांवर ही लस उपलब्ध नसल्यामुळे अखेर महापालिकेच्या केंद्रांवर यावे लागले. आता मात्र महापालिकेच्या केंद्रांवरही मोजकाच साठा उपलब्ध असल्याने नागरिक यांचा संयम सुटू लागला आहे.

कौतुकास्पद! दागिने गहाण ठेवून दाम्पत्याने कोविड रुग्णांसाठी दिले 100 पंखे

मुंबईच्या बीकेसी केंद्रावर 5000 तर गोरेगााव केंद्रावर 4200 डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि या केंद्रावर यापेक्षाा दुप्पट गर्दी दिसून येत आहेत. गेले काही दिवस महापालिकेल येणारा साठा कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे असलेल्या साठ्याचे व्यवस्थित नियोजन आणि नागरिकांना मार्गदर्शन केले तर लसीकरणाची ही मोहीम अखंडपणे चालू राहील आणि नागरिकांनाही मनस्ताप होणार नाही.

First published:

Tags: Mumbai