मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पेपर विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअर झाला, घरून काम करत असताना कोरोनाची लागण झाली आणि...

पेपर विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअर झाला, घरून काम करत असताना कोरोनाची लागण झाली आणि...

असं काही होईल याची 24 वर्षीय शुभमच्या कुटुंबातील कोणालाही कल्पनाच नव्हती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक कोरोनाचा...

असं काही होईल याची 24 वर्षीय शुभमच्या कुटुंबातील कोणालाही कल्पनाच नव्हती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक कोरोनाचा...

असं काही होईल याची 24 वर्षीय शुभमच्या कुटुंबातील कोणालाही कल्पनाच नव्हती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक कोरोनाचा...

पंढरपूर, 29 एप्रिल: कोरोनाने (CORONA) किती कुटुंब उध्वस्त केली याचं उत्तर देणंही शक्य नाही, एवढा आकडा मोठा झाला आहे. पंढरपुरातही एका कुटुंबाला कोरोनाच्या (Pandharpur corona situation) राक्षसाची नजर लागली आणि आठवडाभरातच होत्याचं नव्हतं झालं. कुटुंबातील तरणा ताठा मुलगा कोरोनाने हिरावला. काही दिवसांत त्याचं लग्न होणार होतं (24 year old boy died) मात्र, आता सर्वकाही हवेत विरुन गेलं.

पंढरपूरचे सोमनाथ भोसले हे पेपर विक्रेते आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने एक एक पैसा जमवत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आणि मुलाचं शिक्षही पूर्ण केलं. सोमनाथ भोसले यांचा मुलगा शुभम हा देखिल अभ्यासात हुशार होता. वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवत त्यानं शिक्षणात काहीही कसर सोडली नाही. अगदी पहाटे चारपासून वडिलांना पेपर टाकायला मदत करण्यापासून ते इंजिनीअरींग पूर्ण करेपर्यंत शुभनं कधीही कुणाला निराश केलं नाही.

(वाचा-मुलगी अपशकुनी समज करून जन्मदात्या आई-बापानेच छळले, अखेर चिमुरडीने सोडला जीव!)

पंढरपूरमधल्या स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शुभमनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्यात चांगले गुण मिळाल्याने त्याला कोलकात्यात टीसीएस कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरीही लागली होती. त्यामुळे कुटुंबातील सगळेच आनंदी होते. आता सर्वकाही ठीक होत असल्याचे पाहून शुभमचे कुटुंबीयही आनंदी होते. पण त्यांच्या या आनंदाला कोरोनाची नजर लागली.

(वाचा-वाह रे पठ्ठ्या! COVID सेंटरमध्ये असूनही अभ्यास नाही थांबला,IAS अधिकारी म्हणाले..)

काही दिवसांत होणार होतं लग्न

शुभम कोरोनाच्या परिस्थितीमुळे वर्क फ्रॉम होम करत होता. घरून तो पूर्णवेळ काम करत होता. या दरम्यान त्याचं लग्नं ठरलं आणि साखरपुडाही झाला. लवकरच त्याचे दोनाचे चार हात होणार होते. पण या दरम्यान चार पाच दिवसांपूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणं जाणवून लागली. चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला पंढरपूरमध्येच त्यानं उपचार घेतले पण त्रास वाढू लागला आणि त्यानंतर त्याला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्याची प्रकृती आणखी खालावली. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला,  एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

खरंतर असं काही होईल याची 24 वर्षीय शुभमच्या कुटुंबातील कोणालाही कल्पनाच नव्हती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक कोरोनाचा हा हल्ला त्याच्या कुटुंबावर झाला आणि कुटुंबातील सर्वांच्या स्वप्नांना त्यानं ग्रहण लावलं. अत्यंत कष्टातून शिकवून मोठं केलेला तरुण मुलगा असा अचानक सोडून गेल्यानं, शुभमच्या आई वडिलांनाही प्रचंड धक्का बसला आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Maharashtra, Pandharpur