फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळात संजय राठोडांना लागणार लॉटरी, थेट...
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे. एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना घेऊन केलं बंड, फडणवीस सरकारमध्ये फक्त 13 जणांना मिळणार संधी? एकनाथ शिंदे यांनी जवळपास 39 आमदारांना घेऊन बंड पुकारले होते पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या गटाला 13 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू आणि तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. तर दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. या यादीबद्दल अद्याप भाजपकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raju Shetti, Uddhav thacakrey