Home /News /mumbai /

फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळात संजय राठोडांना लागणार लॉटरी, थेट...

फडणवीस-शिंदे मंत्रिमंडळात संजय राठोडांना लागणार लॉटरी, थेट...

नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत

नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत

नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत

    मुंबई, 30 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर कायमच पडदा पडला आहे. आता भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Fadnavis -shinde government) हे लवकरच सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत. तसेच 2 अतिरिक्त कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदावर चर्चा सुरु आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (केस कापताना लहान मुलांसारखा ढसाढसा रडू लागला; सलूनमध्ये काय घडलं पाहा VIDEO) शिंदे गटातून कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदे, दादा भुसे, दिपक केसरकर, संजय राठोड, तानाती सावंत, बच्चू कडू आणि आशिष जैस्वाल यांची नावे सूचवण्यात आली आहेत. तर राज्यमंत्रिपदासाठी अनिल बाबर, राजेंद्र यड्रावरकर, भरत गोगावले, सदा सरवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. संबंधित माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे. या माहितीबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. याशिवाय भाजपही अद्याप समोर आलेली नाही. पण त्याआधीच शिंदे यांच्या गोटातील सूत्रांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अनेक दावे केले आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे संजय राठोड यांना वनमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता फडणवीस सरकाराच्या काळात राठोड यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या