Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना घेऊन केलं बंड, फडणवीस सरकारमध्ये फक्त 13 जणांना मिळणार संधी?

एकनाथ शिंदेंनी 39 आमदारांना घेऊन केलं बंड, फडणवीस सरकारमध्ये फक्त 13 जणांना मिळणार संधी?

 एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता

    मुंबई, 30 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस राजीनामा दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर कायमच पडदा पडला आहे. आता भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Fadnavis -shinde government) हे लवकरच सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संभाव्य मंत्रिमंडळाची यादी प्रसिद्ध झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. आता भाजपकडून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे. पुढील दोन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी जवळपास ३९ आमदारांना घेऊन बंड पुकारले होते पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या गटाला १३ मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू आणि तानाजी सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. तर दीपक केसरकर, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना राज्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. या यादीबद्दल अद्याप भाजपकडून कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा अशाच पद्धतीने असण्याची शक्यता आहे. अशी असेल टीम देवेंद्र कॅबिनेट देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री चंद्रकात पाटील सुधीर मुनगंटीवार गिरीश महाजन आशिष शेलार प्रवीण दरेकर चंद्रशेखर बावनकुळे विजयकुमार देशमुख गणेश नाईक राधाकृष्ण विखे पाटील संभाजी पाटील निलंगेकर संजय कुटे रवींद्र चव्हाण डॉ. अशोक उईके सुरेश खाडे जयकुमार रावल अतुल सावे देवयानी फरांदे रणधीर सावरकर माधुरी मिसाळ हे राज्यमंत्री होण्याची शक्यता जयकुमार गोरे प्रशांत ठाकूर मदन येरावार राहुल कुल गोपीचंद पडळकर एकनाथ शिंदे गट अशी असतील मंत्रिपद कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे गुलाबराव पाटील उदय सामंत दादा भुसे अब्दुल सत्तार संजय राठोड शंभूराज देसाई बच्चू कडू तानाजी सावंत राज्यमंत्री दीपक केसरकर संदीपान भुमरे संजय शिरसाट भरत गोगावले
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या