अजित पाटील हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी आहे. तर सुमन देवी जम्मू-काश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावातील रहिवासी आहे.
सातारा, 22 डिसेंबर : 'तो साताऱ्याचा आणि ती काश्मीरची...देशाच्या दोन वेगवेगळ्या टोकाल्या असलेल्या दोन जीवांचा नुकताना लग्नसोहळा पार पडला आहे. भारतीय सैन्यातील जवान अजित पाटील यांनी काश्मीरची कन्या सुमन देवी दोघेही लग्नबेडीत अडकले आहे. विशेष म्हणजे, अजित पाटील हा साताऱ्याचा रहिवासी आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे दोघांना फायदा झाला आहे.
अजित पाटील हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी आहे. तर सुमन देवी जम्मू-काश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावातील रहिवासी आहे. अजित पाटील हे सैन्यात दाखल झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ड्युटीवर तैनात आहे. जम्मूमध्ये एका मित्राच्या घरी अजित पाटील गेले होते. तेव्हा सुमन यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
कोट्यवधीचे कर्ज, मित्राचा खून आणि ब्युट्यूथ, सिनेस्टाईल घटनेमुळे पोलीसही हैराण
लॉकडाउनच्या काळात अजित पाटील हे सुमनच्या यांच्या नातेवाईकांसोबत जम्मू काश्मीरमध्ये अडकले होते. या काळात दोघांच्या नात्यांची वीण आणखी घट्ट झाली. काही दिवसांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, किश्तवाडमध्ये अजित पाटील आणि सुमन देवी यांचा काश्मिरी पद्धतीने लग्न झाले. नंतर साताऱ्यामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न झाले.
शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीची अर्धांगवायू, स्ट्रोकशी झुंज
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 असल्यामुळे अजित पाटील आणि सुमन देवी यांना लग्न कसं होईल याची चिंता होती. पण मोदी सरकारने 370 कलम हटवले होते. त्यानंतर दोघांच्या लग्नसोहळ्याचा मार्ग मोकळा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.