Home /News /mumbai /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अंदाज ठरतोय खरा, आजही राज्यात 2553 नव्या रुग्णांची भर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अंदाज ठरतोय खरा, आजही राज्यात 2553 नव्या रुग्णांची भर

राज्याच्या रुग्णसंख्येत एकट्या मुंबईचाच आकडा हा तब्बल 50 हजारांच्या वर आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं आव्हान हे मुंबईचं आहे.

     मुंबई 8 जून: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत जो अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरत आहे. गेले काही दिवस सातत्याने 2 हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडत आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी यासंबंधात अंदाज व्यक्त ेकला होता. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या रुग्णांची संख्या वाढेल. हे दिवस हे रुग्णसंख्या वाढण्याचे आहेत.  रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानंतर तो ग्राफ कमी होईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आजही राज्यात  2553 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 88528वर गेली आहे. काल राज्यात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडली  होती. राज्यात आज १०९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ही एकूण ३१६९ एवढी झाली आहे. आज  १६६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात एकूण ४४३७४ अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या रुग्णसंख्येत एकट्या मुंबईचाच आकडा हा तब्बल ५० हजारांच्या वर आहे. मुंबईत एकूण ५००८५ रुग्ण आहेत. मुंबईत आज १३११ रुग्ण वाढले तर ६४ जणांचा मृत्यू झाला. धारावीत गेल्या ९ दिवसांपासून एकही मृत्यू झाला नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. सूट मिळताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर दरम्यान, कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) औषध नाही, मात्र इतर आजारावरील काही औषधं प्रभावी ठरत आहेत. भारतात सध्या कोरोना रुग्णांवर हायड्रोक्सिक्लोरोक्विन आणि रेमडेसिवीर या औषधांचं ट्रायल सुरू आहे. अशात आणखी एक औषध कोरोनाविरोधी प्रभावी ठरू शकतं, असा दावा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाला कॅन्सरचं औषध टक्कर देऊ शकतं, असा दावा नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्युट आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसीज (NIAID) यांनी एकत्रितरित्या हा अभ्यास केला. सायन्स इम्युनोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय (overactive immune response) होते. शिवाय कोरोना रुग्णांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. अशा रुग्णांसाठी एकॅलब्रुटिनिब (acalabrutinib) हे औषध प्रभावी ठरू शकतं, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. हे औषध ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी वापरलं जातं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai, Uddhav thackeray

    पुढील बातम्या