Home /News /national /

संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन

संपूर्ण देश झाला ‘अनलॉक’; मात्र या 2 राज्यांनी वाढवला लॉकडाऊन

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या दोन राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

    नवी दिल्ली, 8 जून : कोरोना लॉकडाऊनमुळे देशातील बंद झालेल्या शाळा, शॉपिंग मॉल्स, विमानतळ आणि सर्व कार्यालये हळूहळू उघडली जात आहेत. जेथे संपूर्ण देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर 'अनलॉक -1' लागू करण्यात आले आहे. संपूर्ण देशात अनलॉक झालं आहे. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. अनेक खासगी कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यात एका राज्यात मात्र लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मिझोरम सरकारने लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता मिझोरम सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय पश्चिम बंगाल सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मिझोरममध्ये कोरोना विषाणूचा धोका पाहता मुख्यमंत्री जोरामथंगा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सांगण्यात आले की, राज्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे 34 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येणा-या काळात संक्रमण आणखी वाढू शकते. सर्व बाबींचा विचार केल्यावर, लॉकडाऊन आणखी 2 आठवड्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. हे नियम बदलले बैठकीनंतर मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्वीट करून जनतेला नवीन अद्ययावत माहिती दिली. - आज रात्री 12 वाजल्यापासून 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात येणार  आहे. - क्वारंटाईनचा कालावधी आता 21 दिवसांचा असेल. पूर्वी हा 14 दिवसांचा होता. - होम क्वारंटाईन सुविधा केवळ अत्यंत महत्त्वाच्या घटनांमध्येच दिली जाईल. पश्चिम बंगालमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन मिझोरमच्या आधी पश्चिम बंगालने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाले होते की पश्चिम बंगालमध्ये आम्ही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात अडीच लाखाहून अधिक प्रकरणे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणच्या आकडेवारीनुसार, 8 जूनपर्यंत सकाळी 8 वाजेपर्यंत देशात कोरोनाचे एकूण 256611 रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात 125381 अक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 124095 लोक संसर्गापासून मुक्त आहेत म्हणजेच ते बरे झाले आहेत. त्याचबरोबर देशात आतापर्यंत एकूण 7135 लोक मरण पावले आहेत. गेल्या 2 तासांत भारतात कोरोनाचे 9983 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे वाचा -मुंबईतील या हॉटस्पॉटमध्ये Covid ला रोखण्यात BMC ला यश, 7 दिवसात एकही मृत्यू नाही
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या