मुंबई, 11 एप्रिल : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे परिस्थितीत आणखी गंभीर होत आहे. आज मुंबईतील दादरमध्ये 5 नवे रुग्ण आढळले आहे. यात एकात कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. कल्याणमध्येही एका 22 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे आता त्या परिसरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दादरमध्ये मागील आठवड्यात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एकापाठोपाठ रुग्ण आढळत आहे. आज दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. धक्कादायक म्हणजे, यातील 4 जण एकाच कुटुंबातील असून यात 2 पुरुष 2 महिलांचा समावेश आहे. हेही वाचा - पंतप्रधान मोदी लॉकडाऊन वाढवणार; उद्या कळेल पुढचं पाऊल हे चारही जण तावडे इमारतीत राहतात. तर 51 वर्षीय पुरुष प्लाझा समोर राहतो. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा हा 11 वर पोहोचला आहे. खबरदारी म्हणून तावडे इमारतीचा परिसर सील करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. महापालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभाग क्षेत्र परिसरात एका 22 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. हेही वाचा - कर्ज 24 लाखांचं अन् वसूल केले 74 लाख, तरीही घरात घुसून मारहाण, सावकराची गुंडगिरी आज सापडलेल्या या महिला रुग्णामुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 वर पोहोचला असून त्यापैकी 11 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 37 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील 2 लाख 45 हजर 803 घरांना भेट देत 10 लाख 12 हजार 816 नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहितीही महापालिकेने दिली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,666 वर दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. देशभरातील 7 हजार 400 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,666 रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. गेल्या 12 तासांत 92 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी मुंबईत 72 , औरंगाबादमध्ये 2, मालेगावमध्ये 5, पनवेलमध्ये २, केडीएमसीमध्ये 1, ठाण्यात 4, पालघरमध्ये 1, नाशिकमधील नाशिक शहरात 1 , पुण्यात 1, अहमदनगरमध्ये 1 आणि वसईत 1 असे एकूण 91 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत.त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण मुंबई-पुण्यात आढळले आहेत. शनिवारी मुंबईत रुग्णांची संख्या 1008 होती. तर मृतांचा आकडा 64 वर पोहोचला होता. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.