Home /News /mumbai /

भाजप नगरसेवकाला 'ओली पार्टी' भोवणार, अपात्रतेच्या कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भाजप नगरसेवकाला 'ओली पार्टी' भोवणार, अपात्रतेच्या कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महापालिका अधिनियमाप्रमाणे नगरसेवक अजय बहिरा यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

नवी मुंबई, 16 एप्रिल: पनवेलचे भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यात अजय बहिरा यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री सचिवालयाने पनवेल आयुक्तांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ओल्या पार्टीचे आयोजन करणं नगरसेवक अजय बहिरा यांना चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिका अधिनियमाप्रमाणे नगरसेवक अजय बहिरा यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. आता पनवेल आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागलं आहे. हेही वाचा..धक्कादायक! पुण्यात मृतांचा आकडा 46 वर, ससून हॉस्पिटलमध्ये आणखी दोघांचा मृत्यू बर्थडे पार्टी करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे सरकार प्रयत्नशील असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधीच नियमांची पायमल्ली करत आहेत. लॉकडाऊनमध्ये बर्थडे पार्टी करणाऱ्या पनवेलच्या भाजप नगरसेवक अजय बहिरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बहिरा यांच्या 11 साथीदारांवरही पनवेल शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हेही वाचा...लॉकडाऊनमध्ये राज्यातील उद्योग सुरू होणार, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा काय आहे प्रकरण? अजय बहिरा हे पनवेलमधील प्रभाग क्रमांक 20 चे भाजप नगरसेवक आहेत. 10 एप्रिल रोजी अजय बहिरा यांचा वाढदिवस होता. अजय बहिरा यांनी घरीच बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशन करत होते. परंतु पोलिसांनी अचानक धाड टाकली असता तिथे 11 जण उपस्थित होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नव्हतं. यावेळी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्यात आले. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणं अनिवार्य असताना कोणीही मास्क लावलेला नव्हता. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Corona

पुढील बातम्या