नवी दिल्ली, 27 मार्च : देशभरात पसरत चाललेल्या कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एक सरकारी अधिकाऱ्यानेच नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे. क्वाराटाइनमध्ये राहण्याची सूचना असतानाही हा अधिकारी घराबाहेर पडता, इतकच नव्हे तर त्याने दुसऱ्या राज्यात प्रवासही केला.
ही घटना केरळमधील आहे. कोल्लम जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी पदावर तैनात आयएएस (IAS) अधिकारी अनुपम मिश्रा यांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. नुकताच परदेश प्रवास करून ते परत आले होते. मात्र सरकारचे आदेश धुडकावत ते 19 मार्च रोजी केरळहून कानपूरला गेले. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात केरळ सरकारला संपूर्ण माहिती दिली आहे.
संबंधित - कोरोनाच्या भीतीने कर्मचारी गायब, पुणे-मुंबईचा दूध पुरवठा ठप्प होण्याची शक्यतायावेळी ज्या कोणालाही क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले जाते आणि जर त्याने त्याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यावेळी केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. येथे कोरोनाव्हायरस (Covid - 1) संक्रमित रूग्णांची संख्या 137 वर पोहोचली आहे. कोणत्याही पेशंटचा मृत्यू झालेला नाही ही दिलासा देणारी बाब आहे. देशात एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 724 असून 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 67 रुग्ण या आजाराने बरे झाले आहेत.विशेष म्हणजे या आजाराची लागण होण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु संक्रमित रूग्णांची संख्या वाढत आहे. यावर आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, रुग्णांची संख्या अद्यापही नियंत्रणात आहे.
संबंधित - लॉकडाऊनमुळे दारू, सिगारेट झाली बंद; असा करा विड्रॉल सिम्पटम्स सामना
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.