न्यूयॉर्क 27 मार्च : चीन आणि इटली नंतर आता कोरोनाने अमेरिकेत थैमान घातलं आहे. अमेरिकेचे आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं केंद्र आहे. दररोज बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत 385 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37 हजार रुग्णांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. सर्व अमेरिकेत कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या 82 हजारांवर गेली असून त्याने चीनलाही मागे टाकलं आहे. तर सर्व अमेरिकेतल्या मृत्यूचा आकडा 1200 झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत 80 हजार लोकांचा मृत्यू होवू शकतो अशी भीती Institute for Health Metrics and Evaluation ने (IHME) व्यक्त केली आहे. IHME ने यावर संशोधन केलं आहे. परिस्थिती अशीच राहिलं. त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर एप्रिल आणि मे महिन्यात दररोज 2300 जणांचा मृत्यू होवू शकतो असा अंदाजही IHMEच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जगभर कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चीननंतर आता इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये झापाट्याने त्याचा प्रसार होत आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा 21 हजारांवर गेला आहे. तर 4 लाख 72 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा लवकरच 5 लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज Johns Hopkins University च्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे वाचा - कोरोनाची दहशत बघा, महिला शिंकली म्हणून दुकानदारानं फेकलं 26 लाखांचं सामान दरम्यान, पेन्सिलेनियामधून कोरोनाची दहशत दाखवणारा एक धक्कादायक प्रकार घडला. येथील किराणा दुकानदाराने तब्बल 26 लाखांचे सामना फेकून याचं कारण ठरली एक महिला. कोरोनामुळे अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं अत्यावश्याक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. यातच एक महिला किराणा सामना घेण्यास गेली. मात्र सामना घेत असतानाच ती शिंकली. यामुळे या दुकानदाराला आपले सर्व सामना फेकून द्यावे लागले. सीएनएनच्या मते, ही महिला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह तर नाही? अशी भीती दुकानदाराला होती. हे वाचा - Coronavirus : एका फूटबॉल मॅचने घेतला 8 हजार लोकांचा जीव, इटलीतील वैज्ञानिकांचा द पोलिसांनी केली महिलेला अटक दुकानदाराच्या म्हणण्यानुसार या महिलेने स्टोअरमध्ये प्रवेश करताच शिंकायला सुरुवात केली. त्वरित दुकानाच्या मालकाने सर्व वस्तू फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने मुद्दाम असे केले. त्यामुळं या महिलेवर फौजदारी खटला चालविला जाईल. तर, ही महिला कोरोना पॉझिटिव्ह नसली तरी तीची चाचणी करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.