24 तासांत कोरोनाचं केंद्र झाली मुंबई! प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू

24 तासांत कोरोनाचं केंद्र झाली मुंबई! प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू

देशातील कोरोनामुळं सगळ्यात जास्त प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर, मुंबईची स्थिती आणखी वाईट आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवीन प्रकरणं सापडली आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 मे : देशात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार वेगानं होत आहे. देशातील कोरोनामुळं सगळ्यात जास्त प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर, मुंबईची स्थिती आणखी वाईट आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवीन प्रकरणं सापडली आहेत. तर, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा पाहून मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. एकट्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे. गेल्या तासांत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

वाचा-सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अपघात, 3 मजुरांचा जागीच मृत्यू 44 जखमी

वाचा-COVID-19: सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, आता 24 तासांत होणार 1200 सॅम्पल टेस्ट

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत धारावीमध्ये 1000हून अधिक केसेसची नोंद झाली आहे, तर 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात धारावी येथे 66 नवीन रुग्ण समोर आले असून त्यानंतर कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 1028 वर गेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या मते, धारावीमध्ये 6 लाखाहून अधिक लोक राहतात. 6 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, धारावीमध्ये संसर्गाची गती दुपटीने वाढली आहे. येथील कोरोना संक्रमित बहुतेक रुग्ण 31 ते 40 वर्षांचे आहेत.

81 हजारांचा आकडा पार

भारतात कोरोनाचा आकडा वेगानं वाढत आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढत आहे. भारतात सध्या 81 हजार 970 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 2 हजार 649 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 10 लाखांहून अधिक चाचण्या केल्या जात आहे. महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे.

वाचा-धोका वाढला! जालन्यात कोरोनाचा संसर्ग पसरला, डॉक्टर तरुणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

First published: May 15, 2020, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading