सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अपघात, 3 मजुरांचा जागीच मृत्यू 44 जखमी

सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अपघात, 3 मजुरांचा जागीच मृत्यू 44 जखमी

पहिला अपघात मुंबईहून मूळ गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला जालौना इथे तर दुसरा अपघात बहराइच इथे झाला आहे.

  • Share this:

जालौन, 15 मे : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मजुरांचं काम बंद झाल्यानं सगळे कामगार आपल्या मूळ गावी परतत आहेत. हे कामगार घरी जाण्यासाठी धडपडत असताना त्यांचे हाल थांबत नाहीत. इतर राज्यातून येणारे स्थलांतरित कामगार सतत अपघातांना बळी पडत आहेत. गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे झालेल्या अपघातात एकूण 14 कामगारांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर 44 कामगार जखमी झाला आहे.

मुंबईतून 46 कामागरांना मूळ गावी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनानं धडक दिली आहे. या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे बहराइच इथे 60 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकलाही अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 मजूर जखमी झाले आहेत. सर्व जखमी मजुरांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-COVID-19: सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, आता 24 तासांत होणार 1200 सॅम्पल टेस्ट

जालौनमधील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

जालौनच्या एट पोलिस स्टेशन परिसरातील NH -27 इथे गिरथन गावाजवळ परप्रांतीय मजुरांनी भरलेल्या ट्रकला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला. तर 14 मजूर जखमी झाले. डीसीएममधून 46 मजूर प्रवास करत होते.

मदनकोठीजवळ बहराइच लखनऊ महामार्गावर झालेल्या अपघातात 30 कामगार जखमी झाले. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. तर अनेक गंभीर जखमी आहेत. हे सर्व मजूर महाराष्ट्रातून आपल्या मूळ गावी परतत असल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी मुझफ्फरनगर मध्ये झालेल्या अपघातात 10 मजुरांना भरधाव बसनं चिरडलं होतं. या अपघातात 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर गुणी इथे झालेल्या अपघातामध्ये 14 मजुरांचा मृत्यू झाला होता.

हे वाचा-अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय यांचं निधन, बॅंक ऑफिसर ते गॅंगस्टर असा होता प्रवास

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 15, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading