COVID-19: सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, आता 24 तासांत होणार 1200 सॅम्पल टेस्ट

COVID-19: सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, आता 24 तासांत होणार 1200 सॅम्पल टेस्ट

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 20 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 15 मे: देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 20 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज जवळपास 1 लाख सॅम्पलची टेस्ट करण्यात येत आहे. देशातील 504 सरकारी आणि खासगी लॅबमध्ये ही टेस्ट केली जात आहे. कमी वेळेत जास्ट टेस्ट करण्याच्या दृष्टीकोणातून सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने COBAS 6800 मशीन मागवले आहे. या मशीनच्या मदतीने आता जास्त कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे.

हेही वाचा.. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरात घुसला कोरोना, केलं सेल्फ क्वारंटाइन

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी हे मशीन नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडे (NCDC)सुपुर्द केले. झटपट कोरोना टेस्ट करणारे भारतात दाखल झालेले हे पहिले अत्याधुनिक मशीन आहे.

एका दिवसांत 1200 सॅम्पल टेस्‍ट

एनसीडीसी सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या अत्याधुनिक COBAS 6800 मशीनच्या मदतीने कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. 24 तासांत 1200 सॅम्पल टेस्ट करण्याची या मशिनची क्षमता आहे.

डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितलं की, हे मशीन रोबोटिक्सने परिपूर्ण आहे. त्यामुळे हेल्थकेअर वर्कर्सला इन्फेक्शनची धोका निर्माण होणार नाही. तसेच वेळेची मोठी बचत होणार आहे.

COBAS 6800 मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम BSL2 आणि नियंत्रण लेव्हलच्या लॅबची आवश्यकता असते. मशीन कोणत्याही फॅसिलिटीवर ठेवता येत नाही. COBAS 6800 व्हायरल हेपेटाइटिस बी अॅण्ड सी, एचआयव्हा, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लॅमाइडिया आणि नेयसेरेमिया सारख्या आजारांचीही टेस्ट करते.

हेही वाचा.. मुंबई पोलीस दलात कोरोनाची दहशत! 9 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

दुसरीकडे, देशातला कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 80,759 वर पोहोचली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला धडकी भरली आहे. भारतासाठी आता मे आणि जून महिला निर्णयाक ठरणार आहे. गेल्या दोनच दिवसांमध्ये तब्बल 10 हजार रुग्णांची भर पडली आहे. देशातल्या 11 राज्यांमधल्या रुग्णांची संख्या एकत्रित केल्यानंतर तो आकडा 80 हजारांच्या वर गेला आहे.

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असताना ही परिस्थिती आहे. तर जेव्हा लॉकडाऊन शिथिल केलं जाईल तेव्हा कशा प्रकारचा उद्रेक होईल, याविषयी आता तज्ज्ञ अंदाज बांधण्याचं काम करत आहेत.

First published: May 15, 2020, 8:57 AM IST

ताज्या बातम्या