मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोविड केअर सेंटरमधून पळालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला, वसई परिसरात खळबळ

कोविड केअर सेंटरमधून पळालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला, वसई परिसरात खळबळ

बुधवारी संध्याकाळी फायर एक्झिटमधून थापा यांनी पळ काढला होता. त्यानंतर त्यांची शोधाशोध करण्यात आली, पण ते सापडले नाही. त्यानंतर रुग्णालयाच्या वतीनं या व्यक्तीचा शोध घेण्यात आला त्यावेळी त्यांचा मृतदेह निर्मळ परिसरात आढळून आला.

  • Published by:  News18 Desk

वसई, 20 मे: वसईच्या ग्रामीण भागातील जी जी कॉलेज (G G College) येथील कोविड केअर सेंटरमधून (Covid Center) उपचारादरम्यान पळालेल्या 62  वर्षीय रुग्णाचा मृतदेह आढळला (old man fled from Covid center found dead) आहे. निर्मळ परिसरात या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात वसई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे

वसईमधल्या जी जी कॉलेज येथील कोविड केअर सेंटरमध्ये धनसिंग थापा हे 62 वर्षीय व्यक्ती कोरोनावर उपचार घेत होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना 11 मे रोजी याठिकाणी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण धनसिंग थापा यांनी तौक्ते चक्रीवादळामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत बुधवारी या कोविड सेंटरमधून पळ काढला. बुधवारी संध्याकाळी फायर एक्झिटमधून थापा यांनी पळ काढला होता. त्यानंतर त्यांची शोधाशोध करण्यात आली, पण ते सापडले नाही.

(हे वाचा-चिंतेत भर! कोरोना रुग्णांवर ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचा हल्ला, वाचा लक्षणं)

त्यानंतर रुग्णालयाच्या वतीनं या व्यक्तीचा शोध घेण्यात आला त्यावेळी त्यांचा मृतदेह निर्मळ परिसरात आढळून आला. या प्रकारानंतर वसई पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक दृष्ट्या कोरोनामुळंच या व्यक्तीचं निधनं झालं असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

(हे वाचा-...तर आम्हाला आमची भूमिका वठवावी लागेल, नितीन राऊतांचा अजित पवारांना इशारा)

या आधी देखील वरूण इंडस्ट्री येथील एक करोना बाधित रुग्ण पळून घेल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच ही आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळं कोविड केअर सेंटरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तसंच याठिकाणी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्हं निर्माण केलं जात आहे.

अशा प्रकारे रुग्ण पळून बाहेर जात असेल तर या रुग्णांमुळं इतरांना देखील कोरोनाचा धोका संभवण्याची शक्यता असते. या घटनेतील मृत व्यक्ती कोरोनाग्रस्त होते, त्यामुळं त्यांचा इतर कोणाशी संपर्क आला किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ट्रेसिंग आता प्रशासनाला करावी लागणार आहे. मात्र याबाबत माहिती कशी मिळणार हाही मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai, Old man, Vasai