जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Corona चाचणीचा नियम बदलला; आता मुंबईत नाही लागणार डॉक्टरांची शिफारस

Corona चाचणीचा नियम बदलला; आता मुंबईत नाही लागणार डॉक्टरांची शिफारस

Corona चाचणीचा नियम बदलला; आता मुंबईत नाही लागणार डॉक्टरांची शिफारस

मुंबई महापालिकेनं (BMC) COVID चाचण्यांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय चाचणी करता येणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर ठरेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जुलै : Coronavirus चा संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra news) वाढला आहे. त्यावर अधिकाधिक चाचण्या (COVID-19 Test) करणं आणि विलगीकरण (Isolation) हाच उपाय असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. पण मध्यंतरी देशातल्या लॅबवर बेसुमार ताण येत असल्याने सर्वच संशयितांची किंवा संपर्कांची चाचणी होत नव्हती. आता मात्र मुंबईत डॉक्टर किंवा तज्ज्ञांची शिफारस नसेल तर संशयित रुग्णांची चाचणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC) चाचण्यांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने COVID चाचणीसंदर्भात काढलेल्या नव्या आदेशात चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, असं स्पष्ट म्हटलं आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात माहिती दिली. संशयित रुग्णांचं कोरोनाचं निदान अधिक जलद व्हावं आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे, असं महापालिकेनं सांगितलं आहे. कोविड चाचणी करणाऱ्या लॅबवर अतिरिक्त ताण असल्याने मध्यंतरी पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींच्या संपर्कांची किंवा संशयितांची सरसकट चाचणी होत नव्हती. डॉक्टरांच्या सर्टिफिकेटशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय अजूनही देशात कुठेही चाचणी होऊ शकत नाही. हे वाचा हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक? ICMR च्या नियमाप्रमाणे लक्षणं नसलेल्या( Asymtomatic )रुग्णांची चाचणी होत नव्हती. आता मात्र मुंबईत हा नियम बदलून, ज्यांना शंका आहे अशा सर्व रुग्णांची चाचणी होऊ शकणार आहे. कोणत्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय चाचणी करता येणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर ठरेल. हे वाचा पुण्यातल्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण मुंबईत चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. मुंबईत दररोज 5000 च्या आसपास कोविड चाचण्या होतात. मुंबईत आता दररोज 10 हजार चाचण्या करण्याची क्षमता असलेल्या लॅब आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांची चाचणी होऊन वेळीच उपचार सुरू व्हावेत आणि क्वारंटाइन करता यावं यासाठी चाचणीचे नियम बदलले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात