हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक?

हवेतून पसरणारा Coronavirus किती धोकादायक?

कोरोनाव्हायरस हवेत भरपूर वेळ राहतो आणि हवेतून पसरू शकतो, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : आतापर्यंत कोरोनाव्हायरस (coronavirus) हा संक्रमित व्यक्ती शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबाशी इतर व्यक्तींचा संपर्क आला किंवा हे थेंब पडलेल्या पृष्ठभागाशी संपर्क आला तर कोरोनाव्हायरसची लागण होते, हे आपणा सर्वांना माहितीच आहे. कोरोनाव्हायरस असाच पसरतो आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र एका संशोधनानुसार कोरोनाव्हायरस हा हवेतूनही (airborne coronavirus) पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे.

कोरोनाव्हायरस हा हवेतही राहत असून हवेमार्फत पसरत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसून आला आहे. कोरोनाव्हायरस हा हवेतून बऱ्यात दूरपर्यंत जाऊ शकतो, शिवाय हवेत तो राहू शकतो. चीन, अमेरिका, इटली, ब्राझील या देशांतल्या कोरोनाबाधितांच्या प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी काढला आहे. जगातल्या 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी यासंर्भात WHOला पत्र लिहिलं आहे.  या नव्या अभ्यासामुळे बाधित व्यक्तिंपासून किती दूर राहायचे काय काळजी घ्यायची याचे निकषही बदलण्याची शक्यता आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोनाव्हायरस हवेतून पसरतोय म्हणजे नेमकं काय? 

अ‍ॅरोसोल आणि ड्रॉपलेट यांच्यामध्ये फक्त आकाराचा फरक आहे. शास्त्रज्ञांच्या मते, अगदी छोट्या आकाराच्या ड्रॉपलेट्सना अ‍ॅरोसोल असं म्हटलं जातं. ड्रॉपलेट्स म्हणजे खोकताना, शिंकताना उडणारे तोंडातील थेंब. हे ड्रॉपलेट्स जड असतात. जे लगेच जमिनीवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर पडतात आणि या ड्रॉपलेट्सच्या संपर्कात आल्यावर दुसऱ्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होते. त्यामुळे त्यामुळेच सहा फूट सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला जातो आहे.

हे वाचा - हवेतूनही पसरू शकतो कोरोना व्हायरस, 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा

तर अ‍ॅरोसोल म्हणजे  संक्रमित व्यक्ती खोकताना, शिंकताना तर या व्हायरस पसरतोच मात्र जेव्हा ती व्यक्ती बोलते, श्वाच्छोवास करते त्यावेळीदेखील व्हायरस पसरू शकतो. अ‍ॅरोसोल हे हलके असतात आणि ते हवेत बराच वेळ राहू शकतात, अशा हवेच्या संपर्कात आल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

हवेतून पसरणारा कोरोनाव्हायरस किती धोकादायक?

अ‍ॅरोसोल हे लहान आहेत त्यामुळे ड्रॉपलेट्सच्या तुलनेत त्यांच्यामध्ये व्हायरस कमी असावेत. मात्र ते हलके असतात त्यामुळे हवेत कित्येक तास राहू शकतात. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसली तरी ती व्यक्ती बोलताना, श्वासोच्छवास करताना हवेत हा व्हायरस जाऊ शकतो आणि हवेत राहू शकतो. अशावेळी हवा खेळती ताजी नसेल तर हा व्हायरस पसरू शकतो आणि एका संक्रमित व्यक्तीमुळे कित्येकांना याची लागण होऊ शकते. ती व्यक्ती सुपरस्प्रेडर ठरू शकते, असं शास्त्रज्ञ म्हणाले.

हवेतून पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा धोका कसा टाळाल?

शास्त्रज्ञांनी सांगितलं,  सोशल डिस्टन्सिंग हे महत्त्वाचं आहेच. कारण संक्रमित व्यक्ती जितकी तुमच्या जवळ असेल तितक्या त्याच्या अ‍ॅरोसोलमार्फत व्हायरस पसरण्याचा धोका जास्त. तसंच हात धुण्याप्रमाणे घरातील हवादेखील खेळती असावी. म्हणजे व्हेंटिलेशन योग्य असावं.

हे वाचा -  ऑक्सफर्डची corona लस यायला 6 महिने! भारत बायोटेकप्रमाणे हीसुद्धा लस इतक्यात नाही

मास्क वापरण्यावर अधिक भर द्यायला हवा. आरोग्य कर्मचाऱ्यांनी N95 मास्क वापरणंच गरजेचं आहे, ज्यामध्ये अ‍ॅरोसोल फिल्टर करण्याची क्षमता असते. विशेषत: काही वैद्यकीय प्रक्रिया अशा असतात ज्यावेळी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अ‍ॅरोसोलच्या संपर्कात येतात. त्यावेळी या मास्कचा वापर करावाच आणि बाकी आपण इतर सर्वसामान्य नागरिकांनी साधा कापडी मास्क वापरला तरी हरकत नाही. मात्र शक्यतो घरातही मास्क घालण्याची सवय करा.

एखाद्या खोलीतही एअर फिल्टर आणि अल्ट्राव्हायोलेट लाइट्स असण्याची गरज आहे, जे कोरोनाव्हायरसचा नाश करतील, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: July 7, 2020, 5:40 PM IST

ताज्या बातम्या