Home /News /mumbai /

'ती' लेकराला पाहू शकत नाही, देवासारखे धावून आलेल्या डॉक्टरांना तुम्ही कराल सॅल्युट!

'ती' लेकराला पाहू शकत नाही, देवासारखे धावून आलेल्या डॉक्टरांना तुम्ही कराल सॅल्युट!

रोहित गुजर आणि केराबाई गुजर या अंध दाम्पत्याची लॉकडाउनमधील कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

टिटवाळा, 10 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहे. सर्वच स्तरातून डॉक्टरांना प्रोत्साहन दिलं जात आहे. टिटवाळ्यामध्ये  एका डॉक्टराने दाखवलेल्या माणुसकीमुळे समाजात नवा आदर्श घालून दिला आहे. रोहित गुजर आणि केराबाई गुजर या अंध दाम्पत्याची लॉकडाउनमधील कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. या दाम्पत्याच्या घरी एका नव्या पाव्हण्याचे आगमन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी केराबाई गुजर यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. हेही वाचा - पृथ्वीवर आणखी एका संकटाची चाहूल, ओझोनवरील छिद्र 1 दशलक्ष चौरस किलोमीटर वाढलं पण घरची परिस्थितीत बेताची आणि त्यात अंधत्व असल्यामुळे लॉकडाउनमध्ये या दाम्पत्यावर मोठे संकट ओढावले होते. अत्यंत या नाजूक अशा परिस्थितीत या दाम्पत्याकडे कुणीही पाहायला नव्हतं. लॉकडाउनमध्ये नातेवाईकांनाही घरी येणे शक्य झाले नव्हते. तेव्हा एका महिला देवासारखी धावून आली आणि तिने केराबाई यांना टिटवाळ्यातील डॉ. आशिष दीक्षित यांच्या  महागणपती  हॉस्पिटल दाखल केलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर वैद्यकीय प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या. आधीचे रिपोर्ट आणि आताच्या परिस्थितीची चाचणी करण्यात आली. तपासणीअंती केराबाई यांच्या प्रसृतीमध्ये काही अडचणी आल्या होत्या. हेही वाचा -निवृत्तीनंतरही देशसेवा संपली नाही,जवानाने दान केले पेन्शन आणि बचतीचे 15 लाख परंतु, डॉ. आशिष दीक्षित यांनी आपले कौशल्यपणाला लावले. अखेर या अंध महिलेची प्रसृतीही नॉर्मल झाली. बाळही सुखरूप होते. केराबाई यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यांचा आनंद या अंध्य दाम्पत्याच्या चेहऱ्यावर उमटला होतो.  पण, दुसरी चिंता होती ती हॉस्पिटलच्या खर्चाची. आधीच बेताची परिस्थितीत आणि त्यात हॉस्पिटलचा खर्च यामुळे गुजर दाम्पत्य चिंतेत होतं. परंतु, डॉ. आशिष दीक्षित यांनी या अंध दाम्पत्याची परिस्थितीत पाहून कोणतीही फी न घेण्याचा निर्णय घेतला. या दाम्पत्याकडून कोणतीही फी घेतली नाही. या अंध दाम्पत्यासाठी ही सर्वात मोठी गोड बातमी होती. या दाम्पत्याने हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि  डॉ. आशिष दीक्षित यांचे मनापासून आभार मानले. बाळाची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना घरीही सोडण्यात आलं आहे. हेही वाचा - कोरोनामध्ये होऊ शकतात दहशतवादी हल्ले, संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला इशारा कोरोना व्हायरसशी  डॉक्टर जीवाची बाजी लावून लढा देत आहे. तर दुसरीकडे या कठीण परिस्थिती डॉक्टर आपले कर्तव्य तर बजावत आहेच, पण सामजिक बांधिलकीही जपत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या