मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Corona Update: खासगी रुग्णालयांसाठी नव्या गाईडलाइन्स, BMC चा मोठा निर्णय

Mumbai Corona Update: खासगी रुग्णालयांसाठी नव्या गाईडलाइन्स, BMC चा मोठा निर्णय

मुंबईत ओमायक्रॉनची (Mumbai corona case) वाढती प्रकरणे पाहता, बीएमसीने (BMC) खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (BMC has issued Guidelines) जारी केली आहेत.

मुंबईत ओमायक्रॉनची (Mumbai corona case) वाढती प्रकरणे पाहता, बीएमसीने (BMC) खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (BMC has issued Guidelines) जारी केली आहेत.

मुंबईत ओमायक्रॉनची (Mumbai corona case) वाढती प्रकरणे पाहता, बीएमसीने (BMC) खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (BMC has issued Guidelines) जारी केली आहेत.

मुंबई, 06 जानेवारी: मुंबईत ओमायक्रॉनची (Mumbai corona case) वाढती प्रकरणे पाहता, बीएमसीने (BMC) खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (BMC has issued Guidelines) जारी केली आहेत. बीएमसीने सर्व खासगी रुग्णालयांना (All Private Hospitals) दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांच्याकडे असलेली जास्तीत जास्त बेडची क्षमता पुन्हा सक्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका (municipal administration) प्रशासन सज्ज झालं आहे. कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of Corona) आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. मुंबई महापालिकेनं तशा सूचना खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर सरकारनं निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

हेही वाचा-  मुंबईनं बनवला नवा रेकॉर्ड, लसीकरणासंदर्भात समोर आली चांगली बातमी

बीएमसीनं म्हटलं आहे की, रुग्णालयाने 80 टक्के कोविड बेड आणि 100 आयसीयू बेडसह वॉर्ड वॉर रूम उघडावेत. हे वॉर्ड रूम आरक्षित असतील. बीएमसीच्या परवानगीशिवाय येथे कोणालाही भरती करता येणार नाही.

सर्व खासगी रुग्णालये रुग्णांकडून सरकारने ठरवून दिलेले दरच आकारतील. आता सर्व खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णाला दाखल करण्यापूर्वी बीएमसीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

BMC नं जारी केले सुधारित Protocol

असे असतील नवे नियम

एखादी इमारत किंवा इमारतीतील एखादी विंग यांच्यापैकी किमान 20 टक्के किंवा त्याहून अधिक फ्लॅटमधील नागरिक कोरोना बाधित असल्याचं आढळलं, तर ती पूर्ण इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. या इमारतीत रुग्ण आणि इतर रहिवासी यांना कोरोनाबाबतच्या नियमावलीचं आणि होम क्वारंटाईनसाठीच्या सर्व निकषांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

सुधारित प्रोटोकॉल

कुठलीही गंभीर लक्षणं नसणाऱ्या मात्र चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना किमान 10 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. त्याचप्रमाणं सलग 3 दिवस ताप न येणं, हादेखील निकष लावला जाणार आहे. म्हणजेच 10 दिवसांचं होम क्वारंटाईन पूर्ण करण्यासोबतच सलग 3 दिवस ताप न येणं, हा निकषही लावण्यात आला आहे. हे सर्व निकष 4 जानेवारीपासून म्हणजेच मंगळवारपासून अंमलात येणार आहेत.

सुधारित प्रोटोकॉलची यादी

10 दिवस होम क्वारंटाईन आणि 3 दिवस तापाविना असणे

रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींसाठी 7 दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक. अशा व्यक्तींची पाचव्या आणि सातव्या दिवशी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक

संपर्कातील व्यक्तींना कोरोनाची लक्षणं जाणवली तर लगेच कोरोना टेस्ट करण्यात येईल.

क्वारंटाईनमध्ये असलेल्या कुटुंबांना अन्न, औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी सोसायटीतील व्यवस्थापन समितीची असेल

आरोग्य अधिकारी आणि वॉर्ड वॉर रुमचे सदस्य यांना त्यांच्या कामात सोसायटीतील रहिवाशांनी सहकार्य करावे

सील केलेली इमारतीला पुन्हा सामान्य कधी करायचे, याचा निर्णय वॉर्ड पातळीवर घेतला जावा

रुग्ण गंभीर असेल किंवा इतर काहीही समस्या असेल तर वॉर्ड वॉर रुमला नागरिकांनी तातडीनं संपर्क साधावा. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात संदर्भात माहिती घेण्यासाठीही वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा.

First published:
top videos

    Tags: BMC, Coronavirus, Mumbai muncipal corporation