मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सोमवारी राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 6 एप्रिल: राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सोमवारी राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. परीक्षा रद्द होणार नाही, असं उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा कधी घ्यायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षण सचिव, कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. याबाबत 4 विद्यापीठाचे कुलुगुरु आणि 2 संचालक यांची समिती नेमून परीक्षा कधी घ्यायच्या याबाबत निर्णय घेणार आहे.

हेही वाचा.. Lockdown पोलिसांच्या पथकावर टवाळखोरांचा हल्ला, IPS अधिकारी जखमी

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीकक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जाहीर केले.  सोमवारी सकाळी 11:00 वाजता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

हेही वाचा.. भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात : रघुराम राजन

उच्चशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटीसेल कडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करून घेण्यात येथील. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांचे कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना सादर करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही उदय सामंत यांनी संगितले.

दरम्यान,  जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 791 वर पोहोचली आहे. यापूर्वीच राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात केल्या होत्या. याशिवाय सर्व महाविद्यालयाच्या परीक्षाही पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली होती.

आता विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षेबाबत सरकार लवकरच महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. यासाठी 4 विद्यापीठाचे कुलुगुरु आणि 2 संचालक यांची समिती नेमून परीक्षा कधी घ्यायच्या याबाबत निर्णय घेणार आहे.

हेही वाचा...'आता घरी राहून कोरोनाचे बारा वाजवूया', महाराष्ट्र पोलिसांचं अनोखं आवाहन

First published:

Tags: Corona, Coronavirus