Home /News /mumbai /

मुंबईत कोरोनाचा कहर! वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर'मध्ये रुपांतर होणार

मुंबईत कोरोनाचा कहर! वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर'मध्ये रुपांतर होणार

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत.

    मुंबई, 16 मे: महाराष्ट्रातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहृन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmurg Municipal Corporation) मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम ताब्यात देण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात बीएमसीने एमसीएला एक पत्र पाठवले आहे. क्वारंटाइन सेंटरसाठी स्टेडियम उपलब्ध करुन देण्यास MCA ने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांसाठी वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर'मध्ये (Quarantine Center)रुपांतर करण्यात येणार आहे. एमसीए सचिव संजय नाइक यांनी सांगितलं की, वानखेडे स्टेडियमला क्वारंटाइन सेंटर करण्याबाबत बीएमसीचं पत्र मिळालं आहे. संकटाकात स्टेडियम उपलब्ध करुन देण्यास एमसीएनं तयारी दर्शवली आहे. दरम्यान, याआधी एमसीएने कोरोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला 50 लाखांची आर्थिक मदत दिली होती. याचसोबत गरज लागल्यास आपल्या अखत्यारीत असणारी स्टेडियम क्वारंटाइन सुविधेसाठी देण्याचीही तयारी दर्शवली होती. हेही वाचा...पुण्यात कोरोनाच्या धास्तीने 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, रिपोर्ट आला निगेटिव्ह याबरोबरच मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात येत आहेत. गोरेगावमध्ये नेस्को कॉम्प्लेक्स परिसरात काही दिवसांपूर्वी 1000 पेक्षा अधिक रुग्णक्षमता असलेल्या क्वारंटाइन सुविधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती. याव्यतिरीक्त BKC आणि ठाणे अशा 3 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात आलेली आहे. मात्र, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू नोंदला गेला. इतके मृत्यू एका दिवसात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईत 933 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 17512 वर पोहचली आहे. आजवर मुंबईत एकूण 655 जणाचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा.. कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश मुंबईत विविध रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोनारुग्णांपैकी 24 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासांत झाला आहे. पण मुंबई महापालिकेने आणखी 10 जणांचा मृत्यूही आज नोंदवला आहे. हे 10 रुग्ण 10 ते 12 मे दरम्यान मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण 34 रुग्णांचा Covid-19 ने मृत्यू नोंदवला गेला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी संख्या आहे. जवर मुंबईत एकूण 655 जणाचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 334 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4468 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या