कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश

कोरोनाविरुद्ध माकडांवर केलेल्या चाचणीत ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीला यश

माकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर एक हजार माणसांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.

  • Share this:

लंडन, 16 मे : जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना झपाट्यानं संक्रमण करत आहे. विविध देश या व्हायरसविरोधात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक दिलासा देणारी बातमी म्हणजे ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात 6 माकडांवर कोरोनाविरुद्ध तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी करण्यात आली. माकडांवर केलेली ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता ही चाचणी माणसांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1000 वॉलेंटरियर्सना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर होणाऱ्या परिणामांचं परीक्षण करून पुढील गोष्टी ठरवल्या जाणार आहेत.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार माकडांना त्यांनी लस दिल्यानंतर 14 दिवसांमध्ये त्यांनी अँटिबॉडी विकसित केली. हा लसीमुळे विषाणूंचा प्रसार रोखण्यास मदत होते. त्याचसोबत लस दिल्यानंतर माकडांमध्ये निमोनिया आढळला नाही. या लसीचा एक डोस दिल्यानंतर फुफ्फुसांवर कोरोना विषाणूंचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मदत करतो. हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला करत असल्यानं रुग्णाचा मृत्यू होतो असा दावा या संशोधनकर्त्यांनी केला आहे.

हे वाचा-कोरोनाविरुद्धच्या लढाईत डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मदत, मध्यरात्री केली घोषणा

अमरिकेत डिसेंबरपर्यंत येणार कोरोनावर औषध

जागतिक महासत्ता असलेला अमेरिका यावर औषध शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो आहे. अमेरिकेने आपले सर्व प्रयत्न या कामासाठी लावले आहेत. कोरोनावर औषध शोधण्याच्या कामासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन खास माणसांची नियुक्ती केली आहे. 2020च्या डिसेंबर पर्यंत किंवा 2021च्या जानेवारी महिन्यात हे औषध तयार होईल असा अंदाज अमेरिकेत व्यक्त होत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. यावर उपचारासाठी औषध आणि लस शोधण्याचं काम युद्घ पातळीवर सुरू आहे. यासाठी किमान एक वर्ष लागेल तसंच 20 माणसांवर चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

हे वाचा-कोरोना व्हायरसवर वॅक्सिनला लोकांचा विरोध का? सेलिब्रिटीं केलंय समर्थन

हे वाचा-कोरोना नाही तर 'या' कारणामुळं होणार 12 लाख लहान मुलांचा मृत्यू, UNICEFचा खुलासा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 16, 2020, 10:33 AM IST

ताज्या बातम्या