धारावीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहाताराज्य सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

धारावीत कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहाताराज्य सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

धारावी परिसरातील राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता कोविड-19 (COVID-19) सेंटर म्हणून तयार करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई,18 एप्रिल: मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेला धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 60 वर पोहोचला आहे. कोरोनाने आतापर्यंत 7 जणांचा बळी घेतला आहे.

मुंबईतील धारावी परिसरातील रुग्णांची वाढलेली संख्या पाहता राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. धारावी परिसरातील राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता कोविड-19 (COVID-19) सेंटर म्हणून तयार करण्यात येत आहे. याआधीच्या हा परिसराचं विलगीकरण कक्षात रुपांतर करण्यात आलं होतं. या सेंटरमध्ये काम करण्यासाठी आज (शनिवारी) डॉक्टर, नर्स, आया बाई, वॉर्ड बॉय या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यात 20 पद डॉक्टरांसाठी, 50 नर्स 50 वॉर्डबॉय आणि 50 आया बाई या जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या आहेत. ही सर्व पदे आज घेण्यात आलेल्या मुलाखतीवरून भरण्यात येणार आहेत. पुढील महिनाभर हे काम चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा... नातं माणुसकीचं! पोलीसाने स्कुटीवरून 860 किमी प्रवास करत वाचवले तरुणाचे प्राण

कोरोनाचं व्हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. धारावीतील मुकुंदनगरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले असून आकडा हा 14 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 60 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा...'कोरोनाच्या संकटात सरकारने कोट्यवधींच्या वर्क ऑर्डर काढल्याच कशा?'

दरम्यान, महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ 118 रुग्ण आढळून आले. तर मुंबईत केवळ 12 नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार 320 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात सातपैकी 5 जण मुंबईतले होते.

राज्यातल्या कोरोनाबाधित बळींची संख्या 201 वर पोहोचली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 85 झाली असून 122 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही दिलासादायक बाब आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 18, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या