पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार, प्रणव मुखर्जी, मनमोहनसिंग आणि सोनियांना केला फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार, प्रणव मुखर्जी, मनमोहनसिंग आणि सोनियांना केला फोन

कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई ही सर्वांनी एकत्र येत लढायची आहे असं पंतप्रधान वारंवार सांगत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 05 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक मोठे निर्णय घेत आहेत. 21 दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय हा अत्यंत धाडसी पाऊल असल्याचं सांगितलं जातेय. आता पंतप्रधान आणखी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांच्यासह देशातल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना फोन करून माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरस विरुद्धची लढाई ही सर्वांनी एकत्र येत लढायची आहे असं पंतप्रधान वारंवार सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधला आहे. याआधी त्यांनी औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या, उद्योगपती, व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, रेडिओ जॉकी, माध्यम सुमहांचे मालक यांच्याशी चर्चा केली आहे.

त्याचबरोबर त्यांनी प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग, सोनिया गांधी, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते या सर्वांना फोन करून सरकार करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कळवा अशी विनंतीही केली.

त्यामुळे या पुढच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिस्थिती सावरण्यासाठी आणखी मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 हेही वाचा - ‘वुहान लॅब’मधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक रिपोर्ट

कोरोनाची प्रसार भारतात वाढत आहे. रुग्णांची आणि मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या भारतात 3 हजार 374 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार आहे, मात्र भारतातील वाढती रुग्णांची संख्या पाहता हा काळ वाढवला जाऊ शकतो.

भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.

वाचा-कोरोनाच्या संकटात चुकीचे मेसेज पाठवणं पडलं महागात; 14 जणांना अटक, 3 वर्षांची शिक्षा

 भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही गेल्या महिन्याभरात सर्वात जास्त झाली. 30 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत भारतात केवळ 5 कोरोनाचे रुग्ण होते. मात्र पुढच्या 8 दिवसात ही संख्या 50 झाली. तर, एका महिन्यात ही संख्या 2500पर्यंत पोहचली. त्यामुळं 2 मार्च ते 2 एप्रिल या 30 दिवसात भारतात तब्बल 2495 रुग्णांची वाढ झाली. तर, 2 दिवसात एक हजारहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. ही आकडेवारी भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

First published: April 5, 2020, 4:24 PM IST

ताज्या बातम्या