नवी दिल्ली, 05 एप्रिल : कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक मदत मागितली. ती मदत म्हणजे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन टॅबलेटच्या पुरवठ्यावर घातलेली बंदी मागे घ्यावी. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे एक अँटी मलेरिया मेडिसीन आहे ज्याचं नाव ट्रम्प यांनी वैज्ञानिकांच्या हवाल्याने कोरोनाशी लढण्यासाठी सुचवलं होतं. भारतात याचे सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. काही दिवसांपूर्वी एक आंतरराष्ट्रीय पोल करण्यात आला होता. ज्यामध्ये हजारो डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. 30 देशांमधील 6200 फिजिशियन यात होते. त्यांनी म्हटलं की कोरोनाशी लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी औषध आहे. जे क्लोरोक्वीनचं एक रुप आहे. सध्याच्या सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्पेनमध्ये सर्वाधिक वापर केला गेला. तिथल्या 72 टक्के डॉक्टरांनी हे घेण्याचा सल्ला दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी औषधाबाबत दावा केला असला तरी जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र कोरोनाला सध्या कोणतंही औषध रोखू शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे. 2005 मध्ये सार्सच्या वेळीसुद्धा या मेडिसीनचा उंदरांवर प्रयोग करण्यात आला मात्र यातून काही निष्पन्न झालं नाही. मात्र कोणताही पुरावा नसताना या औषधाचं सेवन कोरोना रुग्णांनी स्वत:हून केलं. याचे वाईट परिणाम समोर आले आहेत. हे औॅषध योग्य पद्धतीनं खाल्लं नाही तर दुष्परिणाम होऊ शकतात. हे वाचा : 4 तास झोप, 9 तासांचा प्रवास, कस्तुरबातील कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम क्लोरोक्वीनला ब्रँडनेम अरालेन असं देण्यात आलं आहे. त्यासारखचं असलेलं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनला प्लेक्वेनील म्हणूनही ओळखलं जातं. ब्रिटनच्या एनएचएस नं याला अर्थराइटिसच्या उपचारासाठी योग्य मानलं आहे. 1940 पासून याचा वापर होत आहे. कोरोनाचे संकट युरोप, अमेरिकेत वाढत चाललं आहे. दरम्यान, चीनसह युरोप आणि अमेरिकेत या औषधाचा वापर करण्यासाठी लायसन जारी केलं आहे. तर ब्रिटनने त्यांच्या डॉक्टरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की या औषधाची तपासणी होत नाही तोपर्यंत याचा वापर कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी करू नये. हे वाचा : ‘वुहान लॅब’मधूच पसरला ‘कोरोना व्हायरस’, ब्रिटन गुप्तचर संस्थेचा खळबळजनक रिपोर्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.