• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • खासगी लॅबमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेर तपासले निगेटिव्ह; मुंब्य्रात धक्कादायक प्रकार समोर

खासगी लॅबमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेर तपासले निगेटिव्ह; मुंब्य्रात धक्कादायक प्रकार समोर

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.

12 जणांच्या चाचणीसाठी 36 हजार खर्च करून त्यांना रिपोर्ट देण्यात येत नसल्याने खाजगी लॅब आणि हॉस्पिटलमध्ये मोठे रॅकेट असल्याचा आरोप या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे.

  • Share this:
ठाणे, 08 जून : वडिलांच्या मृत्यूनंतर कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबातील 10 जणांनी एका खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली. त्यांच्यासोबत इतर दोन जण शेजारचेही होते, त्यांचा देखील रिपोर्ट आला त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या चाचणीमध्ये 12 पैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याचा दावा संबंधित लॅबकडून करण्यात आला होता.  रिपोर्ट मात्र या कुटुंबाच्या हातात न दिल्याने मोठे गूढ निर्माण झाले आहे. 12 जणांच्या चाचणीसाठी  36 हजार खर्च करून त्यांना रिपोर्ट देण्यात येत नसल्याने खाजगी लॅब आणि हॉस्पिटलमध्ये  मोठे रॅकेट असल्याचा आरोप मुंब्य्रातील या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला आहे. मुंब्य्रात हे  कुटुंब राहत असून किडनी विकाराने त्रस्त असलेल्या या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या कुटुंबीयांनी आपल्या घरातील 10 जणांचे आणि शेजारी राहणाऱ्या दोन अशा एकूण 12 जणांची चाचणी खाजगी लॅबमध्ये केली होती. त्यानंतर सहा जणांची चाचणी ही पॉझिटिव्ह अली होती. मात्,र या लॅबकडून त्यांना रिपोर्ट देण्यात आला नाही. तर महापालिकेने या सर्व प्रकारानंतर त्यांना 10 दिवस क्वारंटाइन केले. या ठिकाणी देखील चाचणी केल्यानंतर या सहा जणांची टेस्ट निगेटिव्ह आली. हेही वाचा -संजय राऊतांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेटणार मात्र, क्वारंटाइन सेंटरमध्ये देखील त्यांच्या हातात रिपोर्ट देण्यात आले नाही. एकूणच खाजगी लॅब आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये साखळी असल्याचा आरोप आता या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेने देखील या खाजगी लॅबचे रिपोर्ट योग्य नसल्याचे सांगत थायोरोकेअर लॅबवर कारवाई केली असल्याने आता ठाण्यात खाजगी लॅबचे मोठे रॅकेट समोर आले आहे. तसंच या बाबत आम्हाला न्याय व आमचे पैसे परत  मिळणे बाबत या कुटुंबीयांनी विनंती केली आहे, अशा लॅब वर कठोरात कठोर कारवाई करावी अशी विनंती देखील या कुटुंबीयांनी केली आहे. थायोरोकेअर लॅब या आयसीएमआरच्या अधिकृतप्रयोगशाळेत कोविड 19 च्या स्वॅब तपासणीत 6 प्रकरणात चुकीचा अहवाल आढळल्याने या लॅबला ठाण्यात कोविड 19 चे स्वॅब तपासणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे. हेही वाचा -Jio चा धमाका! फक्त 7 आठवड्यांमध्ये झाली तब्बल 97,886 कोटींची गुंतवणूक ठाणे शहरात कोरोना कोविड -19 ची प्राथमिकलक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची कोविड -19 ची तपासणी शासन मान्य प्रयोगशाळेकडेच करण्यात येते. थायोरोकेअर लॅब आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेच्या यादीमध्ये घोषित करण्यात आली होती. परंतु, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदरप्रयोगशाळेने दिलेल्या 6 प्रकरणांमध्ये चुकीचा अहवाल असल्याचे आढळून आले. यामुळे अनेक रुग्णांना सामाजिक आणि मानसिकत्रासातून जावे लागले होते. त्यामुळे 22 मे 2020 पासून ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील संशयितांसाठी कोविड -19 स्वॅब गोळा करू नये असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. कोविड चाचणीबाबत असमाधानकारक सुविधा दिल्यामुळे महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.
Published by:sachin Salve
First published: