Home /News /mumbai /

Jio चा धमाका! फक्त 7 आठवड्यांमध्ये झाली तब्बल 97,886 कोटींची गुंतवणूक

Jio चा धमाका! फक्त 7 आठवड्यांमध्ये झाली तब्बल 97,886 कोटींची गुंतवणूक

आत्तापर्यंत गुंतवणूक केलेल्या सर्व आठही कंपन्यांना Jioचे 21.06 टक्के Stake मिळणार आहेत.

    मुंबई 7 जून: देशातल्या आघाडीच्या Jio Platformsची सध्या जोरदार घौडदौड सुरू आहे. अल्पावधीतच जगातला आघाडीचा टेक आणि डिजिटल ब्रँड झालेल्या रिलायन्सच्या Jioमध्ये जगभरातल्या आघाडीच्या टेक कंपन्यांना मोठी गुंतवणूक करत आहेत. फक्त सात आठवड्यांमध्ये Jioमध्ये तब्बल 97 हजार 886 कोटींची गुंतवणूक झाली आहे. रविवारी Abu Dhabi Investment Authority (ADIA) या कंपनीने Jio प्लॅटफॉर्म्समध्ये 5,683.5 कोटींची गुंतवणूक केली होती. ही कंपनी Jioमध्ये गुंतवणूक करणारी आठवी कंपनी ठरली आहे. आत्तापर्यंत गुंतवणूक केलेल्या सर्व आठही कंपन्यांना Jioचे 21.06 टक्के Stake मिळणार आहेत. अमेरिकेतल्या आघाडीच्या Silver Lak आणि त्यांच्या इतर सहकारी गुंतवणूकदारांनी शनिवारी Jioमध्ये दुसऱ्यांदा गुंतवणूक केली. यावेळी त्यांनी 4,546 कोटींची गुंतवणूक केली. Jioमध्ये गेल्या 24तासांमध्ये झालेली ही दुसरी मोठी गुंतवणूक होती. सिल्व्हर लेकने या आधी 4 मे रोजी Jioमध्ये 5,655.75 कोटींची गुंतवणूक केली होती. सिल्वर लेक फर्म ही टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नावाजलेली फर्म आहे. जगभरात सुमारे 43 अरब डॉलर्सची संपत्ती असून जवळपास जवळपास 100 गुंतवणूकी आणि ऑपरेटिंग व्यावसायिकांची टीम आहे. याआधी, सिल्व्हर लेकने अलिबाबा ग्रूप, एअरबीएनबी, डेल, दीदी चकिंग, हायला मोबाइल, अँट फायनान्शियल, एल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटरमध्येही गुंतवणूक केली आहे. रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Reliance

    पुढील बातम्या