संजय राऊतांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेटणार

संजय राऊतांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना भेटणार

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सोनू सूदनं केलेल्या मदतीला राजकारणाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला.

  • Share this:

 अभिषेक पांडे, मुंबई 7 जून:  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे सोनू सूद यांना घेऊन मातोश्रीवर गेले आहेत. सोनू सूद यांनी विस्थापित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी खूप मदत केली होती. रात्री १०.३० वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे.

त्याच मदतीवरून संजय राऊत आणि काही शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. भाजप हा सोनू सूदचा बोलविता धनी आहे असं राऊतांनी म्हटलं होतं.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या परराज्यातील गोरगरिब मजुरांना गावी जाण्याची भ्रांत असताना सोनू सूद त्यांच्यासाठी धावून आला. त्यामुळं लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडमधील या अभिनेत्याची सगळीकडचं चर्चा झाली. त्याच्या कामाची दखल खुद्द राज्यपालांनीही घेतली. आज बहुतेक मजूर मुंबई बाहेर पडला आहे. पण आता सोनूनं केलेल्या मदतीवरून राजकारण पेटलं आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सोनू सूदनं केलेल्या मदतीला राजकारणाची किनार असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच काही राजकीय शक्तींनी लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदचा प्याद्याप्रमाणे वापर तर केला नाही ना? असा रोखठोक सवाल 'सामना'तून संजय राऊत यांनी केला आहे.

Unlock 1: महाराष्ट्रात उद्या मंदिरं आणि मॉल्स उघडणार का? बाहेर पडण्यापूर्वी वाचा

लॉकडाऊच्या काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या शिताफीने आणि झपाट्याने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकतं? सूद याने म्हणे लाखो मजुरांना परराज्यात त्यांच्या घरी पोहचवलं. म्हणजे केंद्र व राज्य सरकारने काहीचं केले नाही का? असा मार्मिक सवाल सामनातून करण्यात आला आहे. सोनू सूदच्या निमित्तानं आता राजकीय कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा...कोरोनाबाधित 82 वर्षांची आजी हॉस्पिटलमधून गायब; प्रशासनाची वाढली डोकेदुखी

राज्यात कोरोनाच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीपासूनचं संघर्ष पेटला असताना आता त्यात या नव्या वादाची भर पडली आहे. त्यामुळं आगामी काळात या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

First published: June 7, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या