ठाणे 06 एप्रिल : मुंबई आणि परिसरात कोरोनाने थैमान घातलं आहे. दररोज रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आता शहरातल्या अनेक भागात कम्युनिटी लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रूग्णांची संख्या वाढली तर खबरदारीचा उपाय म्हणून गृहनिर्माण विभागाने तब्बल 14 हजार घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माण विभागाचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. गरज पडली तर आणखी 10 हजार घरं उपलब्ध करून देऊ असंही त्यांनी सांगितलं. रूग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठया प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आली असावी असा दावाही त्यांनी केला.
आव्हाड म्हणाले, आज म्हाडा आणि SRA आणि इतर संबंधित सर्व विभागांच्या प्रमुखांची चर्चा करण्यात आली. गृहनिर्माण विभागही कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रेसर आहे. कोकणातही विभागाची 1400 घरं आहेत गरज पडली तर ती घरंही उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी सांगितलं.
कोरोना रूग्णांसाठी मुंबईत जागेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. रूग्णांची संख्या वाढली तर त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण विभागाने घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रकोप वाढतोच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' च्या आसपासचा संपुर्ण परिसर बीएमसीकडून आज तातडीने सील करण्यात आला आहे. बांद्याच्या प्रसिद्ध कलानगर मध्ये मातोश्री आहे. कलानगर बाहेर असलेल्या चहा विक्रेत्याची प्रकृतीची बिघडल्याने BMCने ही खबरदारी घेतली आहे. ही टपरी मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर आहे. या संपूर्ण भागात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्याच्या आयुक्तांचा मोठा निर्णय; शहराचा पूर्व भाग पूर्ण सील
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या ड्रायव्हरला सुट्ट दिली होती. ते स्वत:च कार चालवत बैठकांना उपस्थित राहत आहेत. भेटी गाठीही त्यांनी या आधीच बंद केल्या असून फक्त महत्त्वाच्या बैठकांनाच ते उपस्थित राहत आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधत आहे.
CoronaUpdates: मुंबईत आणखी धोका वाढला, 24 तासांत आढळले 57 कोरोनाबाधित नवे रुग्ण
देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 693 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत 2 मृत्यू नोंदले गेले आहेत. 24 तासांतल्या या 32 मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा 109 वर पोहोचली आहे.
कोरोना संकटांची व्याप्ती लक्षात घेऊन गृहनिर्माण खात्यातील अधिकाऱ्यांना या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आज अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तात्काळ तत्वावर गृहनिर्माण खात्याने 14000 घरांची उपलब्धता सरकारला या आणीबाणीच्या काळात करून दिली आहे. pic.twitter.com/0xxOQX1BZ0
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.