मुंबई, 20 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. देशातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्याही तब्बल 4483 वर पोहोचली आहे. राज्यात आज सकाळी 11 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच हा आकडा 5000 पार करेल अशी भीती आहे. सकाळपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात 283 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई पालिकेच्या हद्दीतील आहे. मुंबईत 187 रुग्ण आढळले आहे. मुंबईपाठोपाठ वसई विरार 22, ठाणे 21, कल्याण डोंबिवली 16, भिवंडी 1, मीरा भाईंदर 7, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेल 6, पिंपरी चिंचवड 9, रायगड 2, सातारा 1 आणि सोलापूरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. हेही वाचा - ‘तुमचा तर मृत्यू झालाय’, पैसे आणायला गेल्यावर महिलेला मिळालं धक्कादायक उत्तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आता पुणे पूर्णपणे सील करण्यात आले आहे. पुणे 8 दिवसांसाठी सील दरम्यान, पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीच्या काळात कुणी बाहेर आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहे. पुढील आठ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील दुकानेही फक्त 2 तास खुली राहणार आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी 100 टक्के संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. **हेही वाचा -** रिलायन्स फाउंडेशनचे जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17265 वर भारतात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 17 हजारांच्या पुढे गेली आहे. आतपर्यंत 2302 लोक बरे झाले आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. यासह देशातील कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 17265 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 543 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाची 1553 नवी प्रकरणं समोर आली असून 36 जणांना देशभरात मृत्यू झाला आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







