मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होईल का? विजय वडेट्टीवार म्हणाले...

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होईल का? विजय वडेट्टीवार म्हणाले...

राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. पण, काही भागात अजून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कायम आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. पण, काही भागात अजून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कायम आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. पण, काही भागात अजून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कायम आहे.

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 27 जून: कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार की निर्बंध शिथिल केले जातील याबद्दल लवकरच निर्णय होणार आहे. पण, राज्यातील रेड झोन भागात लॉकडाऊन कायम राहणार असून मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे, अशी माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली.

'नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढवायची की निर्बंध शिथिल करायचे याबद्दल निर्णय होणार आहे', अशी माहिती दिली.

'राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. पण, काही भागात अजून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कायम आहे. त्यामुळे रेड झोनमधील गावांना लॉकडाऊनमधून ढील देण्याचा प्रश्न नाही. जिथे रुग्ण संख्या कमी झाली तेथे विचार करता येईल', असं संकेत वडेट्टीवार यांनी दिले.

Sagar Dhankhar Murder: सुशील कुमारने फेटाळले सर्व आरोप, हत्या प्रकरणाला नवं वळण

'महाराष्ट्र 12 ते 13 जिल्हे अजून रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यात निर्बंध हटवण्याचा प्रश्न नाही. इतर जिल्ह्यात काय ढील दिले जाईल यावर सरकार विचार करत आहे. तीन टप्प्यात लॉकडाऊन ओपन केला जाईल जेथे ते शक्य आहे तेथेच सूट दिली जाईल. आज कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल', असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

'मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाले आहे. पण लोकलमध्ये सध्या तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना व्यतिरिक्त सूट देण्याची शक्यता नाही', असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

कोकणाचा चार दिवसीय दौऱ्या केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली व कायस्वरूप मदत करण्यासंदर्भात चर्चा झाली. भूमिगत विजेची तार जोडणी करणे, धूप प्रतिबंधक बंधारे बांधावे, यासह इतर बाबी मी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यानुसार सरकार निर्णय घेणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक

तसंच, तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणाला 250 चे पॅकेज दिले जाईल त्यावर आज कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली जाईल. केंद्र सरकारने गुजरात प्रमाणे महाराष्ट्राला 500 कोटींची मदत द्यावी अशी मागणी केली आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितले.

'मराठा समाजाला SEBC आरक्षण देण्याचा माझा कधीच विरोध केला नाही. 2014 मधील मराठा आरक्षणाचा केलेल्या कायद्याला बळकटी दिली असती तर ही वेळ आली नसती. फडणवीसांनी 102 घटना दुरुस्तीनंतर कायदा केल्याने अडचण झाली. मराठा समाजाला आरक्षण नको ही आमची कधीच भूमिका नव्हती, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

First published:

Tags: Vijay wadettiwar