मुंबई, 27 मे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेलेत. प्रति लिटरसाठी ग्राहकांना 100.06 असे पैसे मोजावे लागत आहेत. डिझेलच्या किंमतीने देखील उच्चांकी गाठला आहे. डिझेल 91.17 रुपयांनी मिळत आहे. आज झालेल्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 93.68 रुपये प्रति लिटर तर डिझेल 84.61 प्रति लिटर असं मिळत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 99.94 रुपये आहे तर डिझेल 91.87 प्रति लिटर रुपयांनी मिळत आहे. हेही वाचा- काय सांगता! तिसऱ्या लाटेपूर्वीच 30 टक्के लहान मुलांना होऊन गेला कोरोना? सतत होणाऱ्या पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त झालेत. काही दिवसांच्या फरकाने देशात इंधनाचे दर वाढले जाताहेत. याआधी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी किंमती स्थिर राहिल्या. मात्र आज (गुरुवार) पुन्हा दर वाढले आहेत. हेही वाचा- ‘ ‘माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?’’, प्रश्न विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचा हटके रिप्लाय आज तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात 29 पैशांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी पेट्रोल 23आणि डिझेल 27 पैसे अशा दरानं महाग झालं होतं. या जिल्ह्यांमध्ये आहे 100 रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेल अमरावती- 100.49 औरंगाबाद - 100.95 भंडारा- 100.22 बुलडाणा- 100.29 गोंदिया- 100.94 हिंगोली- 100.69 जळगाव- 100.86 जालना- 100.98 नंदूरबार- 100.45 उस्मानाबाद- 100.15 रत्नागिरी- 100.53 सातारा- 100.12 सोलापूर- 100.10 वर्धा- 100 वाशिम- 100.34
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.